shocking: नव्या वर्षाचं राड्याने स्वागत, 25 गाड्या फोडल्या; राज्यात काय चाललंय?

Pune Crime News: सध्या नववर्षाचे स्वागत (new year celebration) दिमाख्यात झाले आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचा माहोल आहे. एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असताना आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच बातमीनं सगळीकडे खळबळ माजली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात नववर्षाचं दणक्यात स्वागत होताना दिसलं आहे. 

Updated: Jan 1, 2023, 03:47 PM IST
shocking: नव्या वर्षाचं राड्याने स्वागत, 25 गाड्या फोडल्या;  राज्यात काय चाललंय? title=

कैलास पुरी, झी मीडिया, पुणे: सध्या नववर्षाचे स्वागत (new year celebration) दिमाख्यात झाले आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचा माहोल आहे. एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असताना आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच बातमीनं सगळीकडे खळबळ माजली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात नववर्षाचं दणक्यात स्वागत होताना दिसलं आहे. येथे नवीन वर्षाचे स्वागत हे गाड्यांच्या तोडफोडीनं झालं आहे. येथील काही लोकांनी अक्षरक्ष: 20 ते 25 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे. (a group of people try to break cars and auto window)

नववर्षाच्या स्वागताला पिंपरी चिंचवड गाव गुंडांच्या दहशतीने जोरदार हदरला आहे. सर्वसामान्य नागरिकात दहशत निर्माण करण्यासाठी गाव गुंडांनी 20 ते 25 चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीत आणि सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गावगुंडांनी मोठ्या प्रमाणात ऑटो-रिक्षा (auto rickshaw) आणि चार चाकी वाहनांची तोडफोड केली आहे. ऑटो रिक्षात आलेल्या गावं गुंडांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन तसेच सिमेंटच्या गट्टूने मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पिंपरी चिंचवड पोलीस मोठ्या प्रमाणात गस्तीवर होते. असं असताना देखील गाव गुंडांच्या टोळक्यानी पिंपळे सौदागर सारख्या स्मार्ट सिटी भागामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.  

काय घडला प्रकार? 

गावगुंडांनी वाहनांची तोडफोड केल्यामुळे वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील आणि सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक मोठ्या दहशतीखाली आहेत. वाकड पोलीस आणि सांगली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहनांची तोडफोड करणारा गावगुंडांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र 31 डिसेंबरच्या (31 December) मध्यरात्री पोलिसांची गस्त कमी पडल्यामुळे गावंगुडांनी वाहनांची तोडफोड केली अस या भागातील स्थानिक नागरिकांचे म्हणणं आहे.  नव्या वर्षात सध्या सगळीकडेच उत्साह शिगेला पोहचला असतात असा प्रकार ऐकाल्यानं आजूबाजूच्या परिसरात धक्का बसला आहे. सध्या या प्रकारनं 31 डिसेंबरला दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 31 डिसेंबर दारू आणि पार्ट्यांमुळे सगळीकडे मज्जा मस्तीचं वातावरण असताना असा प्रकार अधिक धक्कादायक आहे. या दिवशी अनेक छोटे-मोठे गुन्हे याआधीही घडले आहेत. त्यामुळे अशावेळी सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर येतो. 

31 डिसेंबर अनेक छोटेमोठे अपघातही घडताना दिसतात. पनवेल तालुक्यातील आजीवली गावाजवळ पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक स्विफ्ट कार दुकानांमध्ये शिरल्याने अपघात झाला.रात्रीच्या  वेळेस हा अपघात झाला आहे, यात दुकानदार जखमी झाला असून ,जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. ही गाडी एक वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.