मुंबई : वयाच्या 7 व्या वर्षी अपहरण झालेली चिमुकली आता तब्ब्ल 10 वर्षांनंतर घरी परतली आहे. महत्त्वाचं म्हणजे इतकी वर्षे ती जिथे होती तिथून तिचं घर अवघ्या 500 मीटर अंतरावर होतं. संबंधित मुलीचं नाव पूजा असं आहे. 13 वर्षांनंतर पूजाला कसं समजलं की तिचं अपहरण झालं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण-
22 जानेवारी 2013 रोजी अंधेरीच्या गिल्बर्ट हिल परिसरात भावासोबत शाळेत जात असताना पूजाचं अपहरण झालं होतं. शाळेच्या परिसरात तिचा भाऊ शाळेमध्ये गेल्यानंतर अपहरणकर्त्यांनी पूजाला आईस्क्रीम घेऊन देत तिचं अपहरण केलं होतं. पूजाचं अपहरण हेनरी डिसूझा या महिलेने केलं होतं.
हेनरी डिसूझा यांना मूल होत नसल्यामुळे तिने पूजाचं अपहरण केलं होतं. पोलिसांपासून वाचण्यासाठी हेनरीने पूजाला कर्नाटकमध्ये हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं आणि पूजाला एनी डिसूझा असं नाव दिलं. हेनरी आधी पूजासोबत खूप प्रेमाने वागायची मात्र त्यांना जेव्हा मूल झालं तेव्हा मात्र तिच्या वागण्यात बदल झाला. पूजाला घरी आणल्यावर तिला खूप काम करायला लावायचे.
हेनरीचा नवरा दारू प्यायचा एक दिवस दारूच्या धुंदीमध्ये बोलत बोलत तो पूजाला बोलला, मी तुझा वडील नाही. आम्ही तुझं अपहरण केलं होतं. पूजाचं जेव्हा अपहरण झालं तेव्हा ती 7 वर्षांची होती तिला काही आठवत नव्हतं. जेव्हा तिला समजलं की हे आपले खरे आई-बाप नाहीत त्यानंतर तिने स्वत:चा शोध घेण्यास सुरूवात केली.
असे शोधले खरे आई-वडील-
पूजाने सोशल मीडियावर आपल्या नावाने मिंसिंग झालेल्या पोस्ट शोधायला सुरूवात केली. त्यावेळी तिला एक पोस्ट सापडली. त्यामध्ये पाच नंबर होते. त्यावर फोन लावत तिने व्हिडिओ कॉल केला आणि आपल्या आईशी बोलली, त्यावेळी पूजालाही तिच्या आईने ओळखलं.
दरम्यान, ही घटना मुंबईत अंधेरी पश्चिम इथली आहे. पूजाचं खरं घर हे तिच्या घरापासून 500 मीटर अंतरावर होतं. मात्र पोलिसांनी ना पालकांनी खोलात जाऊन शोध घेतला. यामुळे पूजाला आपल्या घरापासून तब्बल 10 वर्षे दूर रहावं लागलं.