नागपूरच्या वेणा धरणात सात मुले बुडाली, दोघांचे मृतदेह सापडले

नागपूरच्या वेणा धरणाच्या परिसारात बेपत्ता झालेल्या सात तरुणांपैकी आतापर्यंत फक्त एकाचा मृतदेह हाती आलाय. 

Updated: Jul 10, 2017, 09:45 AM IST
नागपूरच्या वेणा धरणात सात मुले बुडाली, दोघांचे मृतदेह सापडले title=

नागपूर : नागपूरच्या वेणा धरणाच्या परिसारात बेपत्ता झालेल्या सात तरुणांपैकी आतापर्यंत फक्त एकाचा मृतदेह हाती आलाय. इतर सहा जणांचा शोध करण्यासाठी तीन बोटींच्या मदतीनं बचावकार्य आज सकाळी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं. पण त्यात अद्यापही यश आलेलं नाही. 

नागपूर - अमरावती महामार्गावरील वेणा धरण येथे रविवारचा दिवस असल्याने नागपूर शहरातील ८ तरुण सहलीसाठी आले होते. धरणातील पाण्यात ३ स्थानिकांसह एकूण ११ जण बोटीतून गेल्यावर तलावाच्या मध्यात गेल्यावर बोटीचे संतुलन बिघडल्याने बोट पालटली... 

याघटनेत ३ जण पोहत तलावाच्या काठावर पोहचले... घटनेची माहिती प्राप्त होताच कळमेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. वाचलेल्या तिघांना वाडीच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. 

उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या मध्ये सहलीसाठी गेलेल्या दोघांचा तर एका नावाड्याच्या समावेश आहे...सहलीसाठी गेलेले सर्व तरुण नागपूरच्या उदयनगर भागातील आहेत...  सुरवातीला करण्यात आलेल्या बचाव कार्यात एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला. 

अंधार झाल्याने रात्री बचाव व शोधकार्यात अडचण येत असल्याने सकाळी बचावकार्य पुन्हा सुरु करण्यात आलं आहे... या शोध मोहिमेसाठी नागपूरहून अग्निशमन दल व एनडीआरएफ च्या चमूला पाचारण करण्यात आले आहे.