...तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही -अजित पवार

पावसाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वाशीमध्ये दिला. 

Updated: Jul 9, 2017, 11:02 PM IST
...तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही -अजित पवार title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर येणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वाशीमध्ये दिला. पक्षबांधणी करण्यासाठी संवाद यात्रेच्या माध्यमातून आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

200 आमदारांचा पाठिंबा असूनही सध्याचं राज्य सरकार सर्वात दुबळं सरकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज्य सरकार फक्त झाडं लावत असून, त्यांनी लावलेली झाडं किती जगतील याबाबत शंका असल्याचं अजित पवार म्हणाले. झाडं लावतानाच शिवसेना भाजप जवळ येतात, एरवी ते एकमेकांना पाण्यात बघतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.