वाशिममध्ये एसटी बसला भीषण अपघात

Updated: Apr 9, 2018, 09:25 PM IST

वाशिम : वाशिम जिल्ह्यातल्या मालेगावजवळ एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी बस झाडावर आदळल्यानं हा अपघात झालाय.

या अपघातात ४०  प्रवासी जखमी झाले आहेत. अकोल्याहून पुसदकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला मालेगावजवळ अपघात झाला आहे. 

बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.