उमरखेडच्या पुलावरून एसटी वाहून गेली, 3 मृतदेह सापडले

एसटी चालकाचा अतातायीपणा प्रवाशांच्या जीवावर भोवला 

Updated: Sep 28, 2021, 10:48 AM IST
उमरखेडच्या पुलावरून एसटी वाहून गेली, 3 मृतदेह सापडले  title=

यवतमाळ : पुलावर पाणी असताना चालकाने बस नेल्याने ही दुर्घटना घडली आहे. उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन पाणी जात असतांना नागपूर डेपोची एसटी बस ड्रायव्हरने नाल्यावरुन  नेली. चालकाने कोणताही अंदाज न घेता बस पाण्यात टाकल्याने गाडी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. बसमधे चार ते सहा प्रवासी होते असे समजते. यामधील तीन प्रवाशांचा मृतदेह सापडला आहे. 

एसटी बसमध्ये बस चालक, वाहक आणि चार प्रवाशी होते. यातील तीन प्रवाशांचा मृतदेह सापडले आहेत. उमरखेड तहसीलदार ठाणेदार सध्या घटनास्थळी आहेत. स्थानिक नागरिक व तालुका टिमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.. दोन लोक झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटीबसच्या टपावर आहेत.

आमदार नामदेव ससाणे यांनी स्वतः बचाव कार्य हाती घेतले आहेत. तसेच आनंद देऊळगावकर तहसीलदार घटनास्थळी आहे. उमरखेडपुलावर पाणी असतानाही एसटी ड्रायव्हरनं बस पाण्यात घातली आहे. एसटी चालकाचा आततायीपणा भोवला असल्याचं म्हटलं जात आहे.  नागपूरच्या घाटोड डेपोची बस पुलावरून वाहून गेली. या बसमध्ये ड्रायव्हर-कंडक्टरसह 5 जण होते.  3 जणांचा मृत्यू झाल्याची बचावलेल्या प्रवासाने माहिती दिली आहे.