Kite :पतंग पकडताना आयुष्याचा दोर कापला; 13 वर्षाच्या मुलाचा भयानक मृत्यू

कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडलेय. पतंग पकडण्याचा नादात 13 वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. 

Updated: Jan 14, 2023, 08:36 PM IST
Kite :पतंग पकडताना आयुष्याचा दोर कापला; 13 वर्षाच्या मुलाचा भयानक मृत्यू  title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : पतंग पकडताना आयुष्याचा दोर कापला गेला आहे. पतंग उडवण्याची (kite flying) हौस एका मुलाच्या जीवावर बेतली आहे. पतंगीच्या मागे धावताना एका 13 वर्षाच्या मुलाचा भयानकरीत्या मृत्यू झाला आहे (13-year old boy dies). नागपुरमध्ये (Nagpur) ही घटना घडली आहे. 

कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडलेय. पतंग पकडण्याचा नादात 13 वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ध्रुव धुर्वे असं या 13 वर्षीय मुलांचं नाव आहे.  ध्रुव हा कुंभार टोली परिसरात राहतो. सध्या जिकडे तिकडे पंतग उडवणे सुरू असून पतंग पकडण्याचा नादात ध्रुव रेल्वे ट्रॅकवर धावत गेला तेवढ्यात मागून आलेल्या यशवंत एक्स्प्रेसने त्याला जोरदार धडक दिली. रेल्वेच्या धडकेत ध्रुवचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गर्दी झाल्यानं धंतोली पोलीस पोहचले. घरातील कामावर गेलें असतांना ध्रुवसोबतच घटना घडल्याच वडील प्रवीण धुर्वे यांनी सांगितले. 

पतंगाच्या मांजाने गळा चिरला

कोपरगाव शहरातील धान्यांचे व्यापारी आनंद गंगवाल हे दुध घेण्यासाठी मोटारसायकलवर जात असताना पोस्ट ऑफिस जवळ एक पतंगाला असलेल्या मांजाने त्यांचा गळा चिरला आहे. सुदैवाने त्याचे प्राण वाचले. यावेळी त्यांनी सध्या नॉयलॉन मांज्यावर बंदी असून अनेक दुकानदार चोरून नॉयलॉन मांज्याची विक्री करीत आहे. तरी पोलीस प्रशासनाने या दुकानदारांचा कसून शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

लातुरमध्ये  मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा

लातूर शहरातील लेबर कॉलनीत एका दुकानावर पोलिसांनी छापा मारून बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त केला आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याचा छंद अनेकजण जोपासतात. मात्र त्यासाठी दोराऐवजी नायलॉन मांजा वापरत आहे. त्यामुळे पक्षी, लहान मुले, वाहनधारक जखमी होतात.अशा नायलॉन मांजावर पोलिसांची करडी नजर असून कारवाईसाठी जिल्हाभर पथके तयार केली आहेत.

नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यावर गुन्हा दाखल

मकरसंक्रांतचा पर्वावर नायलॉन मांजा विक्रेत्यानंतर आता पोलिसांनी नायलॉन मांजाने पंतग उडवणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 21 वर्षीय तरुणाला पतंग उडवताना पोलिसांनी ताब्यात घेतल. नायलॉन मांजाने तो तरुण पतंग उडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ग्रामीण आरटीओच्या मोकळ्या मैदानावर त्या तरुणांजवळ  मांजा मिळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला.