यवतमाळ येथे कारने १० वर्षीय विद्यार्थिनीला चिरडले

भरधाव कारने १० वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला चिरडले.

Updated: Aug 20, 2019, 08:57 PM IST
यवतमाळ येथे कारने १० वर्षीय विद्यार्थिनीला चिरडले title=

यवतमाळ : भरधाव कारने १० वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला चिरडल्याने पिंपळगाव परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.  दोनाडकर लेआऊटमध्ये राहणारी पलक चन्ने ही विद्यार्थिनी वेदधारणी शाळेत पाचवीत शिकत होती. शाळेतून आईसोबत घरी परतत असताना त्यांना भरधाव कारने धोरात धडक दिली. या अपघातात पलकचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई शुभांगी जखमी झाली आहे. 

अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. दरम्यान अवैध वाहतूक करणाऱ्यांना पिंपळगावमधून काही वाहतूक पोलीस सोडत असल्याने या मार्गावरून जाताना अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. मात्र, वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.