राज्यात १ लाख ७२ हजार ४९० विद्यार्थ्यांनी शाळेत लावली हजेरी

राज्यात नववी ते बारावीच्या 70 टक्के शाळा सुरू

Updated: Dec 15, 2020, 02:45 PM IST
राज्यात १ लाख ७२ हजार ४९० विद्यार्थ्यांनी शाळेत लावली हजेरी title=

मुंबई : राज्यात नववी ते बारावीच्या 70 टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या 16 हजार 420 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये तब्बल 1 लाख 72 हजार 490 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या आहेत. 

जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. गडचिरोली, उस्मानाबाद, सोलापूर, वाशिम, लातूर, भंडारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड जिल्ह्यातही 90 टक्क्यांहून अधिक शाळा सुरू झाल्या आहेत. जळगाव, कोल्हापूर आणि सोलापुरात विद्यार्थ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांहून अधिक आहे. 23 नोव्हेंबरनंतर राज्यात शाळा सुरू होण्याचं प्रमाण आतापर्यंत जवळपास दुपटीनं वाढलं आहे. 

काही ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अजूनही तुरळक आहे. चालू शैक्षणिक वर्ष काही महिन्यांमध्येच संपणार आहे. त्यामुळे मुलांना पुढच्या वर्गात पाठवण्यासाठी सरकार कसा कशा प्रकारे मुल्यमापन करणार याबाबत अजून कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. शाळा आणि पालक दोघांच्या मनात हा प्रश्न आहे.