IND vs BAN UPDATE : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दुबळ्या बांगलादेशकडून पराभूत

IND vs BAN UPDATE : टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाच्या बांगलादेश (IND vs BAN 1st Odi) दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबर म्हणजे आजपासून एकदिवसीय मालिकेपासून होतेय. 

IND vs BAN UPDATE : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दुबळ्या बांगलादेशकडून पराभूत

IND vs BAN UPDATE  :  भारत-बांगलादेशविरुद्धच्या तीन वडे मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होतेय. यजमान बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया मिरपूरच्या मैदानात दोन हात करताना दिसेल. न्यूझीलंडविरुद्ध वन डे सीरिज गमावल्यानं टीम इंडियासमोर लक्ष्य असेल ते विजयाचं. पण सलामीच्या मॅचआधीच भारताला मोठा धक्का बसलाय. कारण दुखापतीमुळे शमी या सीरिजमधून बाहेर गेलाय. 

4 Dec 2022, 13:11 वाजता

IND vs BAN : केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात 61 चेंडूंत 50 धावांची भागीदारी झाली.

4 Dec 2022, 13:04 वाजता

IND vs BAN : भारत - बांगलादेश मॅच, भारताला चौथा धक्का. श्रेयस अय्यर 24 धावा करुन मैदानाबाहेर

4 Dec 2022, 12:16 वाजता

IND vs BAN : भारत - बांगलादेश मॅच, भारताला तिसरा धक्का. विराट कोहली 9 धावा बनवून आऊट झाला. 

4 Dec 2022, 12:14 वाजता

IND vs BAN : भारत - बांगलादेश मॅच, भारताला दुसरा धक्का, कॅप्टन रोहित शर्मा 27 धावा बनवून आऊट

4 Dec 2022, 12:10 वाजता

IND vs BAN : भारत - बांगलादेश मॅच,  10 ओव्हरमध्ये भारताचा एक गडी आऊट. तर 48 धावा पूर्ण

रोहित शर्माच्या 27 धावा तर विराट कोहलीच्या - 9 धावा

4 Dec 2022, 11:57 वाजता

IND vs BAN : मैदानात रोहित शर्मा आणि विराट कोहली

4 Dec 2022, 11:55 वाजता

IND vs BAN : भारताला पहिला झटका, शिखर धवन आऊट 

4 Dec 2022, 11:41 वाजता

IND vs BAN : रोहित शर्मा आणि शिखर धवनची चांगली बॅटिंग

4 Dec 2022, 11:37 वाजता

IND vs BAN : दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने लगावला चौकार. रोहित शर्माने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा रेकॉर्ड मोडला. वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा केला विक्रम. अझरुद्दीन यांनी भारताकडून 334 वनडे खेळले आहेत. त्यातील 308 डावांमध्ये त्यांनी 36.92च्या सरासरीने 9378 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 7 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.

4 Dec 2022, 11:34 वाजता

IND vs BAN : भारताकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानात