IND vs BAN UPDATE : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दुबळ्या बांगलादेशकडून पराभूत

IND vs BAN UPDATE : टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाच्या बांगलादेश (IND vs BAN 1st Odi) दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबर म्हणजे आजपासून एकदिवसीय मालिकेपासून होतेय. 

IND vs BAN UPDATE : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दुबळ्या बांगलादेशकडून पराभूत

IND vs BAN UPDATE  :  भारत-बांगलादेशविरुद्धच्या तीन वडे मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होतेय. यजमान बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया मिरपूरच्या मैदानात दोन हात करताना दिसेल. न्यूझीलंडविरुद्ध वन डे सीरिज गमावल्यानं टीम इंडियासमोर लक्ष्य असेल ते विजयाचं. पण सलामीच्या मॅचआधीच भारताला मोठा धक्का बसलाय. कारण दुखापतीमुळे शमी या सीरिजमधून बाहेर गेलाय. 

4 Dec 2022, 18:03 वाजता

IND vs BAN : दुबळ्या बांगलादेशने टीम इंडियाचा 1 विकेटने पराभव केला आहे. बांगलादेशच्या मेहंदीने एकट्याने सामना फिरवत टीम इंडियाच्या हाता-तोंडात आलेला विजय हिसकावला आहे. मेहंदीने 

4 Dec 2022, 16:34 वाजता

बांगलादेशला चौथा धक्का बसला आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसम 29 धावावर आऊट झाला आहे. विराटने त्याची अप्रतिम कॅच घेतली. 
बांगलादेश : 95/ 4

 

4 Dec 2022, 15:57 वाजता

अनामुल हक 14 रन्स करून माघारी परतला, बांगलादेशाला दुसरा धक्का

4 Dec 2022, 15:09 वाजता

IND vs BAN : बांगलादेशला पहिला झटका, नजमुल हुसेन शांतो आऊट. 

4 Dec 2022, 14:41 वाजता

IND vs BAN : मोहम्मद सिराज याची विकेट गेली आणि भारतीय संघ ऑल आऊट झाला. भारताने 40.3 ओव्हरमध्ये 186 रन्स काढले. त्यामुळे बांगलादेशला विजयसाठी 187 रन्सची गरज आहे. 

4 Dec 2022, 14:31 वाजता

IND vs BAN : भारताचे नऊ गडी आऊट, के एल राहुल 73 बनवून आऊट

4 Dec 2022, 14:06 वाजता

IND vs BAN : भारताला आठवा धक्का, दीपक चहर शून्यावर आऊट

4 Dec 2022, 14:02 वाजता

IND vs BAN :  भारताला सातवा धक्का, शार्दुल ठाकुर दोन धावा करुन आऊट

4 Dec 2022, 14:00 वाजता

IND vs BAN :  भारताला सहावा धक्का, शाहबाज अहमद शून्यावर आऊट

4 Dec 2022, 13:56 वाजता

IND vs BAN :  भारताला पाचवा धक्का, वॉशिंग्टन सुंदर 19 धावा बनवून आऊट