Woman Beauty Tips : अलीकडेच लंडनमध्ये एका मॅगझिननं शोध घेतला. हा शो 40 पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांवर आधारीत होता. यात त्यांनी 40 पेक्षा जास्त वय असताना देखील महिला अधिका सुंदर आणि आकर्षक कसा दिसतात हे सांगितलं आहे. सर्वेक्षणात, एका सर्वेक्षणात, चारपैकी तीन महिलांनी कबूल केले की आपल्या पार्टनरसोबत 50 वर्षे रोमँटिक आयुष्य घालवणे हे पालक होण्यापेक्षा जास्त आनंददायी आणि मजेदार आहे. थोडक्यात, काही गोष्टींची काळजी घेतली तर जीवनाचा हा टप्पा आनंददायी ठरू शकतो. काही गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही या वेळेचा पुरेपूर फायदा घेऊ शकता.
1. नियमित आरोग्य तपासणी
50 नंतर हाडांची ताकद हळूहळू कमी होत असल्यानं, हाडांची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. सांध्यावरील दबावामुळे संधिवात होऊ शकते, म्हणून हाडांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हाडांची घनता चाचण्यांसह नियमित आरोग्य तपासणी दर दोन वर्षांनी करणे गरजेचे आहे.
2. महिलांसाठी आवश्यक आरोग्य चाचण्या
महिलांनी नियमितपणे विशिष्ट आरोग्य चाचण्या केल्या पाहिजेत, ज्यामध्ये यूरीन रुटीन और यूरीन कल्चर टेस्ट, अल्ट्रासाउंड पेल्विस टेस्ट ओव्हरी आणि ब्रेस्ट अल्ट्रासाउंड यांचा समावेश होतो. या चाचण्या विविध आरोग्य समस्या लवकर शोधण्यात आणि प्रतिबंध करण्यात मदत करतात.
3. 40 शी नंतर योग्य व्यायाम प्रकार निवडा
तुमच्या उर्जेच्या पातळीनुसार तुमची व्यायामाची दिनचर्या तयार करा. वेगानं चालणे, जॉगिंग, पोहणे आणि आवडत्या खेळात सहभागी होणे फायदेशीर ठरू शकते. तथापि, निवडलेले व्यायाम तुमच्या सध्याच्या शारीरिक स्थितीशी सहन होणारे आहेत की नाही याची सगळ्यात आधी काळजी घ्या.
4. झिंक आणि व्हिटॅमिन बी
सुरकुत्या टाळण्यासाठी तुमच्या झिंकच्या सेवनाकडे लक्ष द्या आणि कॅलरी उर्जेमध्ये रूपांतरित करण्यासाठी तुम्हाला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी मिळेल याची खात्री करा. तुमच्या आहारात बटाटे, टरबूज आणि पपई यांसारख्या पदार्थांचा समावेश करा, जे त्वचेच्या काळजीसाठी बीटा-कॅरोटीनने समृद्ध आहेत.
5. अँटी एजिंग पदार्थांचे सेवन करा
चांगल्या आरोग्यासाठी Anti Aging पदार्थांना समाविष्ट करा. तरुण राहण्यासाठी योग्य पोषणासह संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
हेही वाचा : भारतीय लग्नात वरमालाचे महत्त्व काय? एकदा जाणून घ्या
6. पौष्टिक आहार
वयाच्या 40 नंतर दररोज किमान 200 मिलीग्राम प्रथिने, 30 मिलीग्राम लोह आणि 1500 मिलीग्राम कॅल्शियमचे सेवन करा. प्रथिनांच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका 30% पर्यंत वाढू शकतो. पालक, टोमॅटो, दूध, स्प्राउट्स, अंडी आणि बीट यांचा आहारात समावेश करा.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)