जपानी लोक स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरतात? आरोग्यासाठी वरदान असलेले तेलाचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

जपानी लोक दीर्घ आयुष्य जगण्यात हे जगजाहीर आहे. मग ते दीर्घ आयुष्य जगण्यासाठी स्वयंपाक करताना कोणते तेल वापरतात तुम्हाला माहिती आहे का? आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या या तेलाचे फायदे जाणून तुम्ही आजपासूनच वापरण्यास सुरुवात कराल.   

नेहा चौधरी | Updated: Dec 24, 2023, 01:04 PM IST
जपानी लोक स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरतात? आरोग्यासाठी वरदान असलेले तेलाचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे title=
What oil do the Japanese use for cooking Know the amazing benefits of the boon oil for health

जपानी लोक दीर्घ आयुष्य जगतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अंदाजे 2 टक्के लोक असं आहेत ज्यांचे वय हे 100 वर्षांपेक्षा अधिक आहे. जगाच्या पाठीवर अशी आकडेवारी पाहिला मिळत नाही. यामागचं कारण म्हणजे जपानी लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि त्यांची जीवनशैली कारणीभूत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लोक काय खातात ज्यामुळे ते सर्वात अधिक वर्ष जगतात तेही अगदी निरोगी आयुष्य? भारतासह जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये आहारतज्ज्ञ असं म्हणतात की, पदार्थांमधील तेलाचं प्रमाण कमी करा नाही तर कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बीपी जास्त होतं. अशा परिस्थितीत एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जपानी लोक मग स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरतात? 

स्वयंपाकासाठी जगभरात अनेक प्रकारची तेलं मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. नारळापासून ऑलिव्ह, मोहरीचे तेल, तिळाचे तेल, कॅनोला तेल आणि एवोकॅडो ते रेपसीडपर्यंत, अशी असंख्य तेल आपल्या मिळतात. मात्र त्यात इतकं विरोधाभास आहेत की आपल्याला योग्य तेल कोणते हे ओळखणं कठीण असतं. कोणते तेल आरोग्यासाठी सर्वोत्तम तेल आहे? अलिकडच्या वर्षांत, लोकांनी खोबरेल तेलाचा अधिक वापर करण्यास सुरुवात केल्याच पाहिला मिळत आहे. कारण त्यांचा असा विश्वास आहे की, त्यात अंदाजे 90% संतृप्त चरबी असल्याने ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. हे एक ट्रेंडी सुपरफूड आहे.  पण हार्वर्ड विद्यापीठाच्या नुकत्याच आलेल्या एका अहवालात ते शुद्ध विष असल्याचे असल्याचं म्हटलं आहे. मग अशा परिस्थितीत कोणतं तेल वापरावं हे प्रश्न निर्माण होतो.

हे आहे उत्तम तेल...!

जपानी लोक वापरत असलेले तेल सर्वात सुरक्षित आहे का? ते लोक दीर्घ आयुष्य जगतात हे त्यांच्या आयुष्याचं हे रहस्य म्हणजे तेल आहे का? त्यांना उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल सारख्या अनेक समस्या देखील नसतात. तुम्हाला जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात तिळाचे तेल दिसेल. काही लोकांना ऑलिव्ह ऑइलमध्ये अन्न तयार करता. मात्र बहुतेक जपानी कुटुंबे रेपसीड तेल किंवा कॅनोला तेलात अन्न शिजवतात.

रेपसीड तेल आरोग्यासाठी वरदान

रेपसीड तेल हे आरोग्यासाठी वरदान मानले गेले आहे. कारण त्यात फॅटी अॅसिडचं प्रमाण बऱ्यापैकी संतुलित असतं. याला पांढरे मोहरीचे तेल या नावाने देखील ओळखलं जातं. कारण त्याचे पांढरे दाणे मोहरीसारखे दिसतात. यामध्ये फारच कमी प्रमाणात इरुसिक ऍसिड आढळतं, जे रोगांपासून आपले संरक्षण करण्यास मदतगार सिद्ध होतं. त्यातील फॅटी ऍसिडची रचना अशी आहे की ते शरीराला घातक ठरत नाही. इतर सर्व तेलांच्या तुलनेत ते पौष्टिक आणि हलके तेल असतं. हे गरम करण्यासाठी प्रतिरोधक असल्याने ते तळण्यासाठी वापरलं जातं.