Side Effects Of Skipping Dinner: अन्न, वस्त्र निवारा या आपल्या मुलभूत गरजा आहेत. दोन वेळचं जेवण हे आपल्या जगण्यासाठी फार जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरासाठीही ते फारच महत्त्वाचं असतं परंतु जर का आपण एकदा जरी जेवण करणं टाळलं तरीसुद्धा त्याचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो हे नक्की. सध्या अभिनेता सलमान खान याचं एक वक्तव्य चर्चेत आहे. तो म्हणाला की, गेल्या 25-26 वर्षांपासून त्यानं रात्रीचं जेवण (Dinner) हे केलेलं नाही. इतकी वर्षे सलग रात्रीचं जेवण न केल्यानं नक्कीच सर्वांचाच भुवया उंचावल्या.
पण काळजी करू नका तो घराबाहेर कुठेच बाहेर जेवायला गेलेला नाहीये असं तो म्हणाला आहे परंतु यावरून एक विषय प्रकाशानं समोर येतो तो म्हणजे खरंच जर का रात्रीचं जेवणं टाळलं तर काय होईल? यावरून तुम्हाला-आम्हाला हा प्रश्न पडतो की नक्की याचा आपल्या शरीरावर, आरोग्यावर किंबहूना जीवनशैलीवर काय वाईट/ चांगला परिणाम होतो?
मुळात रात्री जेवण स्कीप करण्याची सवय ही अत्यंत वाईट असते. आपल्यासाठी ती चांगलीही नसते. रात्री आपल्याला हलकं फुलकं जेवण करण्याचा सल्ला दिला जातो परंतु अनेक जणं ते ही घेतं नाहीत. हा विषय गंभीर आहे. या लेखातून आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत की नक्की रात्रीचं जेवण स्कीप केल्यानंतर काय होतं? लोकं रात्रीचं जेवण स्कीप करतात याला मुख्य कारण असतं ते म्हणजे वजन नियंत्रित करणं. वजन नियंत्रित करण्यासाठी रात्रीचं जेवण टाळणं हे योग्य ठरू शकणार नाही. आपल्याला शरीरातील फॅट्स आणि कॅलरीज कमी होणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या शरीराला योग्य ते पोषण मिळणं.
त्यामुळे रात्रीचे जेवण हे स्कीप करणं टाळू नका. आपल्या शरीराला योग्य उर्जा मिळणं हे आवश्यक असते. योग्य आहार आणि झोप झाली तर आपला दुसरा दिवसही अत्यंत प्रफुल्लित होतो आणि आपली जीवनशैलीही सुधारते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)