राधिका मर्चंटच्या पाठवणीवेळी वडील गहिवरले, मुकेश अंबानींच्या डोळ्यातही पाणी... ; आयुष्यातील सर्वात कठीण क्षण

राधिका मर्चंटचा शाही विवाह सोहळा अंनत अंबानीसोबत 12 जुलै रोजी पार पडला. लेकीच्या लग्नातील भावूक क्षण म्हणजे तिची पाठवीची वेळ. विरेन मर्चंट लेकीच्या लग्नात गहिवरले. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 13, 2024, 11:23 AM IST
राधिका मर्चंटच्या पाठवणीवेळी वडील गहिवरले, मुकेश अंबानींच्या डोळ्यातही पाणी... ; आयुष्यातील सर्वात कठीण क्षण title=

लेकीची पाठवणीची वेळ ही प्रत्येक आई-बापासाठी कठीण असते. ज्या मुलीला आपण जन्म दिला, जिला आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं तिला असं मोठं झाल्यावर दुसऱ्याच्या घरी पाठवणं ही गोष्ट प्रत्येक आई बापासाठी जडच असते. मग तो बाप कितीही गडगंज श्रीमंत असो. अगदी असंच काहीसं मर्चंट कुटुंबियांसोबत झालं आहे. 

राधिकाचं लग्न देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबात होत आहे. ही कितीही आनंदाची आणि अभिमानाची बाब असली तरीही राधिकाच्या वडिलांसाठी या सगळ्यापेक्षा लेकीची पाठवणी हा क्षण जास्त त्रासदायक असेल. राधिकाच्या घरी गृह शांती पूजा करण्यात आली. यावेळी राधिका आणि तिच्या वडिलांचा हा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

बापासाठी खास क्षण 

गृह शांतीच्या या पूजेत आपण बघू शकतो. राधिका आणि तिचे वडील विरेन मर्चंट यांच्यातील हा अतिशय हळवा क्षण आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बाप आणि लेकीचं हे नातं कायमच वेगळं असतं. बापाचा क्षणाक्षणाला विचार करणारी लेक ही खास असते. 

मुकेश अंबानींसाठी सून नाही तर लेक आली 

अंबानी कुटुंबाच्या घरी सून येत असली तरीही त्यांनी आपल्या सुनांना मुलींचा दर्जा दिला आहे. जशी ईशा तशीच श्लोका आणि आता राधिका. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी आपल्या मुलीप्रमाणे राधिकाला एका घरातून दुस-या घरात आणत आहेत. प्रत्येक पित्याला आपल्या मुलीला सासरच्या घरात माहेरापेक्षा जास्त प्रेम मिळावं असं वाटत आहे.  अंबानी कुटुंबीयांचे हे प्रेम पाहून वीरेन मर्चंट आणि बाकीच्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले होते. तर या भावूक क्षणी राधिकाला मुकेश अंबानी यांनी मिठी मारून जवळ घेतलं. 

ज्याप्रमाणे वीरेन मर्चंटच्या डोळ्यात आपल्या मुलीसाठी भावूक झाले होते. त्याचप्रमाणे अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचे मालक मुकेश अंबानी देखील त्यांच्या हृदयाचा तुकडा ईशा अंबानीला निरोप देताना भावूक झाले. हा तो दिवस होता जेव्हा अंबानी कुटुंबाची मुलगी पिरामल कुटुंबाची सून होणार होती.

आईने पाहिली 'या' क्षणाची वाट

प्रत्येक आई या दिवसाची वाट पाहत असते जेव्हा ती आपली मुलगी नववधू बनताना पाहते. तो दिवस राधिकाच्या आईच्या आयुष्यात आला आहे आणि गृहशांती पूजेच्या वेळी जेव्हा ती आपल्या मुलीची आरती करत होती तेव्हा तिच्या डोळ्यात आनंद दिसत होता. राधिकाची आई शैला मर्चंट यांच्या चेहऱ्यावर जितका आनंद होता तितकाच आनंद आत्या सोबत आपल्या मुलीचे आणि सुनेचे स्वागत करणारी होती आणि डोळ्यात तितकाच ओलावा होता.