मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकच डिप्रेशनचे शिकार, अभ्यासात धक्कादायक खुलासा

मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकांवर होतोय परिणाम, अनेक पालक डिप्रेशनचे शिकार 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 12, 2024, 11:24 AM IST
मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकच डिप्रेशनचे शिकार, अभ्यासात धक्कादायक खुलासा  title=

Parenting Tips: एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जे पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम बनवण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. किंवा जास्त मेहनत करतात त्याच पालकांवर विपरित परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. पालकच या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये डिप्रेशन, स्ट्रेसमध्ये जात असल्याचं दिसून आलं आहे. आपल्या मुलांना परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना, पालक आजारी आणि मानसिक पातळीवर खूप दबावाखाली आहेत.

आपल्या मुलाने आयुष्यात आघाडीवर राहून चांगले करिअर घडवावे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. म्हणूनच, पालक आपल्या मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच इतर ऍक्टिविटींमध्ये जसे की, जिमनॅस्टिक, ड्रॉईंग क्लास, डान्सिंग क्लास यासारख्या गोष्टींमध्ये परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतात. अभ्यासासोबतच मुलांना खेळ, कला आणि इतर अनेक कौशल्ये शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की जे पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम बनवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत त्यांच्यासाठी ते हानिकारक ठरत आहे. आपल्या मुलांना परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना, पालक आजारी आणि मानसिक स्तरावर खूप दबावाखाली आहेत. 

मानसिक आरोग्यावर परिणाम

ओहायो विद्यापीठातील संशोधकांनी एक संशोधन केले. या संशोधनात अमेरिकेतील 700 हून अधिक पालकांनी सहभाग घेतला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 57 टक्के पालकांनी कबूल केले की या गोष्टीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडत आहे. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की,

पालकांच्या अंतर्गत आणि बाह्य अपेक्षांबद्दल असमाधानी वाटते. स्वतः पालकांना मानसिक स्तरावर कसे वाटते हेही यातून कळते.

या सगळ्यासोबतच त्यांना त्यांच्या जोडीदारासोबतचे नाते कसे सांभाळायचे याचीही चिंता असते आणि घर व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवण्याचे दडपणही या लोकांवर असते.

परिपूर्ण पालकत्वाच्या मानकांनुसार जगण्याचा प्रयत्न केल्याने लोक कमजोर होऊ शकतात, असे अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि ओहायो स्टेट कॉलेज ऑफ नर्सिंगमधील सहयोगी क्लिनिकल प्रोफेसर केट गोलिक यांनी सांगितले.

सोशल मीडियाने अपेक्षा वाढवल्या

सोशल मीडियावर अनेक गोष्टी पालक पाहत असतात. या सगळ्यावरुन पालक मुलांवर अनेक जबाबदारी टाकताना दिसत आहे. आपल्या मुलाने इतरांच्या मुलाप्रमाणे सर्वगुण संपन्न असणं अपेक्षित असतं. अशावेळी पालकांनी या सगळ्या गोष्टी लक्षात न घेता मुलांच्या त्यांच्या सोईने आणि आवडीने वाढू द्यावं.