मुकेश अंबानींकडून हर्ष गोयंका शिकले यशाचे 3 मंत्र, X वर शेअर केला व्हिडीओ;तुमच्या खूप कामाचा!

Mukesh Ambani Motivational Video:   42 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी त्यांच्या आयुष्यातील 3 गोष्टी सांगत आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 6, 2024, 01:35 PM IST
मुकेश अंबानींकडून हर्ष गोयंका शिकले यशाचे 3 मंत्र, X वर शेअर केला व्हिडीओ;तुमच्या खूप कामाचा! title=
मुकेश अंबानींच्या यशाचे 3 मंत्र

Mukesh Ambani Motivational Video: मुकेश अंबानींचं नाव देशातील श्रीमंत्यांच्या यादीत टॉपला घेतलं जातं. अंबानीं हे यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. देशासह जगभरातील लाखो-करोडो युवक मुकेश अंबानी आणि त्यांच्या व्यवसायातून प्रेरणा घेत असतात.  आता यामध्ये अब्जाधीश उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंकादेखील जोडले गेले आहेत. हर्ष गोयंका सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते अनेक उत्तमोत्तम पोस्ट करत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांची एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये हर्ष गोयंका यांनी दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी झालेल्या संभाषणातून नेहमीच खूप काही शिकल्याचे सांगितले आहे. काय आहे या व्हिडीओत? हर्ष गोयंकांनी यातून कशी प्रेरणा घेतली? सविस्तर जाणून घेऊया. 

या पोस्टमध्ये हर्ष गोयंका यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मुकेश अंबानींच्या भाषणाचा आहे. या 42 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये अंबानी त्यांच्या आयुष्यातील 3 गोष्टी सांगत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत हर्ष गोयंका म्हणतात, 'त्यांच्या आयुष्यातून शिकलेले तीन धडे मी तुमच्यासोबत शेअर करतोय.'

मुकेश अंबानींकडून शिकण्यासारखे 3 धडे 

मुकेश अंबानी व्हिडीओमध्ये ज्या तीन गोष्टींचा उल्लेख करत आहेत त्यांना हर्ष गोयंकाही त्यांच्या यशाचा मंत्र मानतात. या आहेत मुकेश अंबानींच्या तीन गोष्टी:

ध्येयावर लक्ष केंद्रित करा

जर तुम्ही ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल, असे या व्हिडिओमधील भाषणात मुकेश अंबानी म्हणतायत.  जर तुम्ही अडचणींवर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही कधीही तुमचे ध्येय गाठू शकणार नाही, असेही ते पुढे सांगतात. 

कठोर परिश्रम करा

मुकेश अंबानी यांचे मत आहे की, यशासाठी नेहमीच कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. सर्वोत्कृष्ट बनण्याचे ध्येय ठेवले पाहिजे, असे ते आपल्या भाषणात बोलताना दिसतात. आपण केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वोत्तम बनले पाहिजे.

सकारात्मक रहा

मुकेश अंबानींसाठी सकारात्मकता सर्वात महत्त्वाची आहे. व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी सांगत आहेत की, यश मिळवण्यासाठी आत्मविश्वासासोबतच आत्मविश्वासही असायला हवा.

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुकेश अंबानी हे देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $105 अब्ज आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या बाबतीत ते 14 व्या स्थानावर आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत 8.93 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे.