Christmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO

Christmas 2023 Greeting Cards : नाताळ हा आवडीचा सण असून तो प्रत्येकासाठी खास असतो. नाताळात गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड दिले जातात. अशावेळी : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी खास ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा आयडिया देणार आहोत. 

नेहा चौधरी | Updated: Dec 23, 2023, 01:39 PM IST
Christmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO  title=
Make a special greeting card with your own hands to wish your loved ones a Merry Christmas watch the VIDEO

Christmas 2023 Greeting Cards : ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा मोठा सण असला तरी हा सर्व धर्मातील लोक साजरा करतात. जगभरात 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसानिमित्त हा सण साजरा केला जातो. ख्रिश्चन लोकांकडे रोशनाई, स्टार कंदीर, ख्रिसमस ट्री आणि प्लम केक बनवला जातो. सांता आपल्यासाठी गिफ्ट घेऊन येतो. अशावेळी आपल्या प्रियजनांना खास नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी गिफ्टसोबत स्वतःच्या हातांनी (Handmade Christmas Greeting cards) बनवलेले ग्रीटिंग कार्ड द्या आणि त्यांचा आनंद द्विगुणीत करा. (Make a special greeting card with your own hands to wish your loved ones a Merry Christmas watch the VIDEO)

हे ग्रीटिंग कार्ड लहान मुलंही अगदी सहज तयार करु शकतात. ते बनवायला जितके सोपे आहे तितकेच ते बनवल्यानंतर ते अधिक सुंदरही दिसतं. या कार्डसाठी रंगीत कागद, मणी, रिबन आणि तारे घ्या आणि या व्हिडीओमध्ये दाखवलं तसे हे ग्रीटिंग तयार करा. 

ख्रिसमसच्या दिवशी सीक्रेट सांता लाल रंगाच्या सूटमध्ये येतो आणि मुलांना गिफ्ट देतो. सिक्रेट सांता म्हणून तुम्हाला गिफ्टसोबत देण्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड नक्की आवडेल. हे बनवण्यासाठीही सोप आहे. 

या 3D पॉप अप कार्डद्वारे तुम्ही प्रियजनांना खूष करु शकता. याला बनवायला थोडा जास्त वेळ लागत असला तरी एकदा बनवलं की तिचं सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

यंदाचा नाताळ तुमच्या प्रियजनांनासाठी खास करायचं असेल तर हे ग्रीटिंग कार्ड त्यांना बनवून द्या त्यांना नक्की आवडेल. 
 

 ख्रिसमसच्या दिवशी, आपण फुलं आणि मणीसह ख्रिसमस कार्ड देखील बनवू शकता.