Idli Batter Fermentation In Winter: इडली-डोसा हा नाश्तात देण्यासाठी परफेक्ट पर्याय आहे. कारण हे पदार्थ झटपट होतात आणि फार मेहनतही लागत नाही. तसंच, हे पदार्थ कमी तेलकट आणि पोटभरीचेदेखील असतात. घरात इडली करायची म्हटलं तर पीठ तयार करावं लागतं. तसंच, ते पीठ आंबवल्यानंतरच इडलीला अधिक चव येते. मात्र थंडीच्या दिवसांत पीठ हवे तेस आंबत नाही. अशावेळी इडल्या फसतात. त्यामुळं थंडीत पीठ आंबवण्यासाठी टिप्स जाणून घ्या.
इडली किंवा डोसा दोन्ही पदार्थ पोटभरीचे आहेत. इडलीसोबत सांबार हा अनेकांचा आवडीचा पदार्थ असतो. पण घरात इडलीचे पीठ आंबवण्यासाठी अनेक मोठ्या प्रोसेसमधून जावे लागते. थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ छान फुलून येत नाही. त्यामुळं इडलीला छान चव येत नाही. अशावेळी इडली करण्यासाठी काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे.
- इडलीचे पीठ बनवण्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि पाच ते सदा तासांसाठी भिजवून घ्या.
- त्यानंतर उडदाची डाळ आणि एक चमचा मेथीचे दाणे देखील वेगळ्या भांड्यात भिजत ठेवा
- इडलीच्या पीठात पोहे घातल्यास इडल्या छान सॉफ्ट होतात. त्यामुळं 1/4 कप पोहे 3-4 तासांसाठी भिजत घाला. नंतर, भिजत घातलेली उडदाची डाळ आणि पोहे मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
- नंतर तांदुळदेखील मिक्सरमध्ये चांगली वाटून घ्या. नंतर हे पीठ 8-10 तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवू शकता.
- थंड वातावरणात पीठ लवकर आंबत नाही. त्यामुळं इडल्या फुगत नाहीत किंवा चव बिघडते. पीठ आंबवण्यासाठी उबदार वातावरणाची गरज असते. अशावेळी या काही टिप्स तुम्ही वापरू शकता.
- पीठ आंबवण्यासाठी ठेवल्यानंतर त्या डब्याभोवती किंवा पातोल्याभोवती घोंगडी किंवा स्वेटर गुंडाळून ठेवा. किंवा पीठ अशाठिकाणी ठेवा जिथे थोडी तरी उब मिळले.
- तुमच्या घरात जर ओव्हन असेल तर थोडावेळासाठी ओव्हन गरम करा. ओव्हन थोडासा गरम झाल्यावर स्विच बंद करा आणि आत पीठ ठेवा. ही उष्णता पीठ आंबण्यासाठी पुरेशी आहे.
- लक्षात घ्या की, तांदूळ कमीत कमी पाण्याने बारीक करुन घ्या. तसंच, पीठ मऊसर होते. तसंच, इडलीचे पीठ साधारण 8 तास तरी आंबवण्यासाठी ठेवावे. थंडीत पीठ आंबण्यासाठी आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे.