सध्या अनेकजण आरोग्याबाबतीत जास्त सजक असतात. अशावेळी जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ खाण टाळलं जातं. काहीवेळा घाई गडबडीत भाजीत तेल जास्त पडत त्यामुळे भाजी फार तेलकट होते. अशा भाजीचे सेवन केल्यास आरोग्या संबंधित समस्या वाढू शकतात. परंतू काही सोप्या ट्रिक्स आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही भाजीतील जास्तीच तेल काढू शकता.
भाजीची चव न बदलता त्यातून अतिरिक्त तेल काढण्यासाठी तुम्ही बर्फाची ट्रेक वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम एक बर्फाचा तुकडा घ्या आणि तो तेलात बुडवून पुन्हा बाहेर काढा. यामुळे तेलाचा तवंग हा बर्फावर बसतो, ही ट्रिक तुम्ही दोन ते तीन वेळा वापरल्यास भाजीतील अतिरिक्त तेल कमी होऊ शकते. तेल जर जास्त असेल तर अधिकवेळा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता.
भाजीत तेल जास्त पडल्यास तुम्ही त्यात उकडलेले बटाटे टाकून तेल बॅलेन्स करू शकता. यासाठी सर्वात आधी उकडलेले बटाटे मॅश करून ड्राय रोस्ट करा. मग हे बटाटे भाजीत टाकून ५ मिनिट उकळवून मग गॅस बंद करा. ५ मिनिट भाजीवर झाकण ठेवल्यास बटाटे तेल सोकून घेतात. अशा प्रकारे तुम्ही जास्तीच तेल काढून टाकू शकता.
हेही वाचा : केस खूप गळतायत? दिवसातून फक्त 10 मिनिटं करा हे काम, केस होतील मजबूत
भाजी पडलेले जास्तीच तेल काढण्यासाठी तुम्ही टोमॅटोची प्युरी वापरू शकता. यासाठी भाजीच्या वरची लेयर काढून वेगळी करा. मग एका पॅनमध्ये टोमॅटो प्युरी रोस्ट करून भाजीत मिक्स करा मग भाजी २ मिनिटं मंद गॅसवर उकळवा. यामुळे भाजीतील तेल लवकर कमी होईल.
भाजीत जर तेल जास्त झालं असेल तर तुम्ही त्यात कॉनफ्लॉवर टाकू शकता. यासाठी मक्याचं पीठ घेऊन त्यात पाणी टाकून मिक्स करा. मग हे मिक्सचर मंद गॅसवर शिजवून घ्या. आता हे मिश्रण तुम्ही भाजीत मिक्स केले की अतिरिक्त तेल कमी होईल. तसेच भाजीची चव सुद्धा बिघडणार नाही.