योग किंवा व्यायाम केल्यानंतर किती वेळाने आंघोळ करावी? जाणून घ्या आंघोळीची योग्य वेळ

उत्तम आरोग्यासाठी आपण जिमला जाऊन व्यायाम किंवा योगा करतो. पण व्यायाम किंवा योगानंतर लगेचच आंघोळ केल्यास आरोग्याला नुकसानदायक ठरतं. मग योगा किंवा व्यायाम केल्यानंतर किती वेळानंतर आंघोळ करावी, हे जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Dec 11, 2024, 04:40 PM IST
योग किंवा व्यायाम केल्यानंतर किती वेळाने आंघोळ करावी? जाणून घ्या आंघोळीची योग्य वेळ  title=

आजकाल फिट राहण्यासाठी जिम आणि योगावर मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जातं. तरुण पिढीसोबत वयस्कर मंडळीही व्यायाम करतात. व्यायाम किंवा योगासने केल्यामुळे शरीराचे स्नायू लवचिक होतात आणि शरीर मजबूत होतं. त्यासोबत अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात. तुम्ही सुद्धा व्यायाम किंवा योगा करत असाल तर एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. व्यायाम किंवा योगा केल्यानंतर स्वाभाविक आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो. त्यामुळे अशावेळी सर्वप्रथम आंघोळ करतो. पण तुमची ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. कारण व्यायाम किंवा योगा केल्यानंतर त्वरित आंघोळ केल्यास आरोग्याचे नुकसान होतं. त्यामुळे अशावेळी व्यायाम किंवा योगानंतर लगेच आंघोळ करायची नाही. मग किती वेळाने आंघोळ करायची काय सांगतात तज्ज्ञ आज आपण जाणून घेणार आहोत. (How soon should you shower after yoga or exercise Know the right time for bathing)

व्यायाम किंवा आसन केल्याने शरीर थकतं. शरीरातील ऊर्जा वाढल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा इतर कोणत्याही वेळी व्यायाम आणि योगासने केल्यास आपण आंघोळ करतो. बरेच लोक सकाळी उठून व्यायाम आणि योगासने करतात आणि लगेच आंघोळ करतात. तसंच लगेचच नाश्ताही करतात. मात्र असे केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तज्ज्ञानुसार योगासने केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये आणि आंघोळीसाठीही त्यांनी सल्ला दिलाय. 

योगासने केल्यानंतर किती वेळ अंघोळ करावी?

सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटाने किंवा योगा केल्यानंतर 30 मिनिटाने आंघोळ करावी. व्यायाम आणि योगा केल्यानंतर लगेच आंघोळ करू नका. व्यायामानंतर लगेच आंघोळ का करत नाही योगासने केल्यानंतर शरीरात ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचा परिणाम आंघोळीवर होतो. त्यामुळे व्यायामानंतर लगेच आंघोळ करू नये. योगासने किंवा व्यायाम केल्याने शरीराचे तापमान वाढते किंवा थंड होते. तज्ज्ञांच्या मते, ताबडतोब अंघोळ केल्याने शरीराचे तापमान वाढू शकते.

योगानंतर आंघोळीचे आरोग्यावर होणारे परिणाम योगासने झाल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने वायू, पित्त, खोकला इत्यादी समस्या होण्याची भीती असते. याशिवाय त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तापमानात सतत बदल झाल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. योगासन करण्यापूर्वी आंघोळीचे फायदे योगासने किंवा व्यायाम करण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीराचा थकवा कमी होतो. याशिवाय याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. यासोबतच अंतर्गत ऊर्जा आणि फोकसही वाढतो.  

शरीर स्वच्छ आणि संतुलित ठेवण्यासाठी आंघोळ आवश्यक आहे. आंघोळ न केल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सकाळी उठून नियमित आंघोळ करावी. नियमित आंघोळ न केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच अंघोळ केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत मिळते. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)