नॉनव्हेजसोबत कधीच खाऊ नका 'हे' 6 पदार्थ, आतडी पिळवटून टाकेल

Non Veg Food : मांसाहारासोबत काही ठराविक पदार्थ खाणे शरीरासाठी घातक होते. या 7 पदार्थांचा शरीरावर विपरित परिणाम होतो. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 6, 2024, 07:08 PM IST
नॉनव्हेजसोबत कधीच खाऊ नका 'हे' 6 पदार्थ, आतडी पिळवटून टाकेल  title=

मांसाहार करणे प्रत्येकालाच आवडते. अगदी मटण, मासे किंवा चिकन आवडीने आणि चवीने खाल्ले जाते. प्रोटीन, व्हिटॅमिन, फॅटी ऍसिड असल्यामुळे शरीरातील कार्य उत्तम राहते. तसेच मांसाहारामुळे मेंदू, डोळे यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत होते. मात्र हा मांसाहार चुकीच्या पद्धतीने केल्यास शरीराला हानी पोहोचते. 

तसेच अनेकजण मांसाहाराचे पदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या घटकांचा समावेश केला जातो. त्याचप्रमाणे मांसाहार काही पदार्थांसोबत खाल्ल्यास त्याचे शरीराला विपरित परिणाम करतात. यामुळे ऍसिडिटी, पचनक्रिया, गॅस, अल्सरचा त्रास, कॅन्सर देखील होऊ शकतो. मांसाहारामुळे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका निर्माण होतो. 

दूधजन्य पदार्थ 

नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चुकूनही दुधाचे सेवन करू नये. किंवा दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत. कारण दूध आणि मांसाहार आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. जर तुम्ही दुपारच्या जेवणात मासे, मांस किंवा चिकन खाल्ले असेल तर त्यानंतर लगेच दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ खाणे धोकादायक ठरू शकते. मांसाहार आणि दूध मिसळले की ते विषारी बनतात. त्यामुळे ब्लॉकेजही होऊ शकते. मासे, मांस किंवा कोंबडीचा स्वभाव गरम असतो पण दुधाचा स्वभाव थंड असतो. अशा परिस्थितीत गरम आणि थंड एकत्र खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

लिंबूवर्गीय पदार्थ 

अनेकजणांना मांसाहारासोबत लिंबू खाण्याची सवय असते. अनेकजण मांसाहारावर लिंबू पिळून खातात. लिंबू आणि लिंबूवर्गीय पदार्थ शरीरासाठी घातक असतात. यामुळे ऍसिड तयार होते. तसेच काही जण मांसाहारासोबत फळे खातात. सलाड म्हणून या फळांचा समावेश केला जातो. . फळे खाल्ल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. पचनक्रियेवर त्याचा नक्कीच खोलवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरात टॉक्सिन्स वाढू शकतात. त्याचा परिणाम दीर्घ किंवा अल्प कालावधीत केव्हाही दिसून येतो.

तळलेले पदार्थ 

नॉनव्हेजसोबत तळलेले पदार्थ खाऊ नये कारण यामध्ये असलेले सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचे उच्चप्रमाण असते. ते शरीरासाठी घातक असते. तसेच मांसाहारानंतर किंवा सोबत दही खाणे टाळावे. मांसाहार शरीरातील उष्णता वाढवते तर दही थंड करते. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर लगेच दही आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्याचा पचनक्रियेवरही मोठा परिणाम होतो.

बीन्स 

तृणधान्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरात साखरेची पातळी निर्माण होते. फायबर मांसाहारासोबत खाल्ल्यास शरीरात त्याचा नकारात्मक परिणाम होतो. पण हा परिणाम शरीरासाठी घातक असते. 

जीवनशैलीवर काय परिणाम? 

अनेकदा आपण सवय म्हणून मांसाहारासोबत वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो. यामुळे अनेक समस्या तयार होतात. अशावेळी त्याचा थेट परिणाम जीवनशैलीवर होतो. अपचन, ऍसिडिटीमुळे तुमच्यातील आत्मविश्वास कमी होतो. तसेच सततच्या ढेकर येत असल्यास अनेक ठिकाणी लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरे जातो.