लक्ष्मीपूजनाला दाराबाहेर काढा फुलांची रांगोळी; 5 मिनिटांत होणारी सुरेख रांगोळी

 Flower Rangoli Design Ideas: दिवाळीच्या दिवसांत आणखी एक आकर्षण असते ते म्हणजे रांगोळी. फुलांची रांगोळी कशी काढायची पाहा 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 11, 2023, 07:19 PM IST
लक्ष्मीपूजनाला दाराबाहेर काढा फुलांची रांगोळी; 5 मिनिटांत होणारी सुरेख रांगोळी title=
Diwali 2023 5 minute Flower Rangoli design ideas to illuminate your Diwali celebration

Flower Rangoli Design Ideas: दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीत फराळ, कंदिल, फटाके याबरोबरच रांगोळीचीही उत्सुकता असते. दाराबाहेर किंवा अंगणात मोठ-मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात कोणाची रांगोळी सरस याचीही चुरस लागते. संस्कार भारती, ठिपक्यांची रांगोळी, चैत्रांगण रांगोळी, फुलांची रांगोळी यासारखे प्रकार असतात. जागेची अडचण असेल तर ठिपक्यांची किंवा फुलांची रांगोळी काढणे खूप सोयीचे जाते. 

दिवाळीत दाराबाहेर सुबक रांगोळी काढण्याची प्रथा आहे. या रांगोळीवर पणती ठेवल्यानंतर त्याची शोभा अजूनच वाढते. दिवाळीच्या दिवसांत रोज एकाच प्रकारची रांगोळी काढण्यापेक्षा तुम्हीही वेगवेगळ्या रांगोळ्या काढून पाहा. सोपी आणि लवकर होणारी रांगोळी म्हणजे फुलांची रांगोळी. तुम्ही झटपट फुलांची रांगोळी काढू शकता. 

फुलांची रांगोळी कशी काढायची 

दिवाळीच्या दिवसात पुजेसाठी खूप फुलं आणली जातात. फुल वाहून झाल्यानंतपर दुसऱ्या दिवशी त्याच्या पाकळ्यांची छान रांगोळी काढता येते. पूर्वी शुभकार्यात जेवणाच्या ताटाभोवती फुलांची महिरप काढली जायची. अगदी पेशवाई काळापासून ही रांगोळी काढायची प्रथा आहे. प्रदूषण टाळण्यासाठीही फुलांची रांगोळी हा बेस्ट पर्याय आहे. पाण्यावर रांगोळी काढण्यासाठीही फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जायचा. ही रांगोळी खूप दिवस टिकते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. 

फुलांच्या रांगोळीची डिझाइन 

- झेंडुच्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर करुन तुम्ही छान रांगोळी काढू शकता. केशरी, पिवळ्या रंगाच्या फुलांचा वापर तुम्ही करु शकता. 

- झेंडूच्या फुलांबरोबर अष्टर, गुलाब यासारख्या फुलांचाही वापर करु शकता. त्याचबरोबर आंब्याची पाने बारीक करुन हिरवा रंगही छान तयार करु शकता.

- घराबाहेर जागा कमी असेल तर गोल आकारात ही छोटीशी फुलांची रांगोळीही आकर्षित करेल. 

- फुलांची रांगोळी काढून त्यावर मधोमध समई ठेवल्यासही रांगोळी खूप सुंदर दिसते. 

- आंब्याची पाने आणि झेंडूच्या दोन ते तीन रंगाची फुले वापरुनही तुम्ही छोटीशी रांगोळी काढू शकता.