सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात सहावेळा दंश; पळून मावशीच्या घरी गेला तर तिथेही पोहोचून केला दंश, अखेर...

आश्चर्याची बाब म्हणजे सापापासून आपला जीव वाचवण्यासाठी तरुण पळून आपल्या मावशीच्या घऱी गेला होता. यानंतर काकाचं घर गाठलं होतं. पण तरीही सापाने त्याचा पाठलाग करणं सोडलं नाही. या घटनेमुळे तरुणाच्या नातेवाईकासह नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून, खळबळ उडाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 8, 2024, 01:53 PM IST
सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात सहावेळा दंश; पळून मावशीच्या घरी गेला तर तिथेही पोहोचून केला दंश, अखेर... title=

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एका तरुणाला सहाव्यांदा सर्पदंश झाला आहे. फक्त दीड महिन्यात सापाने सहावेळा एकाच तरुणाला दंश केला आहे. तरुणाच्या सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सापापासून आपला जीव वाचवण्यासाठी तरुण पळून आपल्या मावशीच्या घरी गेला होता. यानंतर त्याने काकाचं घऱ गाठलं होतं. पण तरीही सापाने त्याचा पाठलाग सोडला नाही. सापाने वारंवार त्याच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे तरुणाच्या नातेवाईकासह नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून, खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर उपचार कऱणारे डॉक्टरही आश्चर्यचकित आहेत. 

जिल्ह्याच्या मलवा पोलीस ठाणे क्षेत्राच्या सारा गावात हा प्रकार घडला आहे. येथे राहणाऱ्या विकास दुबेला दीड महिन्यात सापाने एक-दोन नव्हे तर तब्बल 6 वेळा दंश केला आहे. पण त्याच्या सुदैवाने दरवेळी उपचारानंतर तो बरा झाला. सध्याही एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. कारण गेल्या दोन दिवसांत सापाने सहाव्यांदा त्याला दंश केला आहे. 

विकासने सापापासून आपला जीव वाचवण्यासाठी घर सोडलं आहे. आधी तो आपल्या मावशीच्या घरी पोहोचला होता. पण तिथेही साप पोहोचला आणि त्याला दंश केला. यानंतर तो आपल्या काकाच्या घऱी गेला असता सापाने तिथेही त्याचा पाठलाग केला आणि दंश केला. आता विकास आणि त्याच्या कुटुंबीयांना आपण नेमकं काय करावं हे समजत नाही आहे. 

पीडित विकास दुबेने सांगितलं आहे की, गेल्या दीड महिन्यात 6 वेळा सापाने त्याला दंश केला असून दरवेळी तो वाचला आहे. साप दंश करण्याआधी आपल्याला साप हल्ला करणार असल्याचा भास होतो असं त्याचं म्हणणं आहे. या घटनेमुळे डॉक्टरही आश्चर्यचकित आहेत. 

विकासने सांगितलं की, 2 जूनच्या रात्री 9 वाजता बेडवरुन खाली उतरताना सर्वात आधी सापाने दंश केला. यानंतर नातेवाईकांनी त्याला जवळच्या नर्सिंग रुममध्ये दाखल केलं. उपचारानंतर तो घरी परतला असता 8 दिवसांनी म्हणजेच 10 जूनच्या रात्री दुसऱ्यांदा सापाने त्याला दंश केला. यानंतर पुन्हा एकदा उपचार झाल्यावर तो घऱी परतला. पण यामुळे तो थोडा घाबरला होता. पण हे इथेच थांबणारं नव्हतं. 

यानंतर पुढील 20 दिवसांत दोन वेळा सापाने त्याला दंश केला. प्रत्येकवेळी उपचारानंतर तो बरा झाला. या घटनेमुळे त्याचे नातेवाईक आणि डॉक्टर आश्चर्यचकित झाले होते. काहींनी त्याला काही दिवस घरापासून दूर जाण्याचा सल्ला दिला. 

घाबरलेल्या विकास रायने सर्वांचा सल्ला ऐकला आणि आपल्या मावशीच्या घरी गेला. पण मावशीच्या घरीही साप पोहोचला. 28 जूनला सापाने मावशीच्या घरी विकासला पाचव्यांदा दंश केला. त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळीही तो उपचारानंतर बरा झाला. यानंतर तो कोकाच्या घऱी राहण्यासाठी गेला. पण तिथेही सापाने पाठलाग करत सहाव्यांदा दंश केला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चांगली नसल्याचं सांगितलं जात आहे. पण या घटनेमुळे कुटुंबीय भीतीखाली आहेत.