अखुरथ संकष्टी चतुर्थी निमित्त जाणून घ्या मुलांची नावे आणि अर्थ

Sankashti Chaturthi 2023 : 2023 चा शेवटचा संकष्टी चतुर्थी व्रत 30 डिसेंबर 2023 रोजी पाळला जाईल. या दिवशी बाप्पाची पूजा मनोभावे केली जाते. बाप्पाच्या नावावरुन ठेवा मुलांची गोंडस नावे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 30, 2023, 02:27 PM IST
अखुरथ संकष्टी चतुर्थी निमित्त जाणून घ्या मुलांची नावे आणि अर्थ  title=

2023 मधील शेवटची अखुरथ संकष्टी चतुर्थी 27 डिसेंबर रोजी आहे. जीवन समस्यांनी घेरलेले असेल, जर तुम्हाला आर्थिक, नोकरीशी संबंधित किंवा कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर पौष महिन्यातील अखुरथ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही दुर्मिळ उपाय करून पाहा, असा विश्वास आहे. गणपतीच्या दर्शनाने सर्व समस्या दूर होतात. भगवान गणेश ही बुद्धी, वाणी आणि ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या कृपेने सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे.

गणपतीची नावे आणि अर्थ 

इभान - हत्तीच्या मुखासमान दिसणारी देवता अर्थात गणपती बाप्पा असा या नावाचा अर्थ होतो.

 रूद्रांश - रूद्राचा अंश असणारा अर्थात शंकराचा अंश असणारा बाप्पा. गणपती हा शंकराचा पुत्र असल्याने त्याचा अर्थ रूद्रांश असा होतो. 

 श्रीजा - हे थोडंसं वेगळं नाव आहे. हे नाव मुलासाठी आणि मुलीसाठी दोन्हीसाठी वापरण्यात येतं. प्रत्येकाशी संवाद साधू शकणार आणि मित्रत्व असणारा असा व्यक्ती अर्थात गणपतीचा स्वभाव नेहमी असाच वर्णिला असल्याने त्याला श्रीजा असेही म्हटले जाते. 

 परीन - गणपती बाप्पाचं दुसरं नाव म्हणजे परीन असं म्हटलं जातं.

 लविन - गणपती बाप्पाचा सुगंध आपल्या शरीरात असणारा असा म्हणजे लविन.

 गौरीक -गौरीचा पुत्र आणि तिचं सुंदर रूप असणारा असा देव म्हणजे गौरीक 

 अयोग - गणपती बाप्पाशी अतूट नाते असणारा असा अयोग. 

दुर्जा -कोणाहीकडून नष्ट न केला जाणारा असा. हे नाव अगदीच युनिक आहे

नित्या - हे नाव मुलगा अथवा मुलगी या दोघांचंही ठेवता येतं. नित्या अर्थात कायमस्वरूपी राहणारा

ओजस - कायमस्वरूपी तेजस्वी राहणारा. भगवान गणेशाप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धीमान

स्वोजस -बाप्पासप्रमाणे तेजस्वी. तेजोमय असा जो अतिशय खंबीर आणि ताकदवान आहे

तक्ष -अतिशय नक्षीदार डोळे असणारा असा देव. गणपतीच्या डोळ्यांकडे बघितल्यावर नेहमीच प्रसन्नदायी वाटतं. असे डोळे ज्या मुलाचे असतात त्याच्यासाठी नाव नक्कीच शोभून दिसेल.

अर्हत - सर्वांकडून आदर प्राप्त करणारा असा. गणपती ही अशी देवता आहे जिचा प्रत्येक जण आदर करतो.

स्वरूप - सौंदर्याची देवता आणि सत्यतेचा देव असा या नावाचा अर्थ होतो

सुमुख -कायम सुंदर दिसणारा. कधीही पाहिलं तर प्रसन्न दिसणारा असा चेहरा

नंदन - आनंद देणारी देवता अर्थात नंदन

हरिद्र - सोन्यासारखी कांती असणारा देव. सर्व देवतांमध्ये गणेशाची कांती ही तेजस्वी आणि अप्रतिम मानली जाते.

क्षिप्रा -हे नावदेखील मुलगा अथवा मुलीचे नाव ठेवण्यात येते. सर्व देवतांकडून कौतुक होणारा देवता असा या नावाचा अर्थ होतो

अविघ्न - विघ्नांपासून सुटका मिळवून देणारा