चपात्या लाटायचा कंटाळा येतो? 'या' ट्रिकने एकाचवेळी लाटा 5 चपात्या, कशा ते पाहा

Kitchen Hacks : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क एकाचवेळी 5 चपात्या बनवताना दिसत आहे. चपात्या लाटायचा कंटाळा आलेल्या प्रत्येकासाठी एक चांगली युक्ती आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 9, 2024, 04:55 PM IST
चपात्या लाटायचा कंटाळा येतो? 'या' ट्रिकने एकाचवेळी लाटा 5 चपात्या, कशा ते पाहा  title=

अनेक महिलांना चपात्या बनवण्याचा प्रचंड कंटाळा येतो. कणिक मळणे आणि चपात्या करणे हे अतिशय कंटाळवाण काम त्यांना वाटतं. चपात्या करायला खूप वेळ लागतो म्हणून खूप महिला फक्त वरण भाताचं जेवणं करुन स्वयंपाक आटोपता घेतात. अशा महिलांसाठी एक किचन हॅकचा व्हिडीओ समोर आलाय, जो प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक महिला चक्क एकाचवेळी 5 चपात्या करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ही ट्रिक अनेक महिलांना आवडली आहे. 

एकाचवेळी 5 चपात्या बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स 

या पद्धतीने कणिक मळणे
उत्तम चपात्या लाटण्यासाठी व्यवस्थित कणिक मळणे अत्यंत गरजेचे असते. अतिशय घट्ट किंवा अगदी सैलसर कणिक मळून चालत नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने कणिक मळून त्यावर तेल लावून थोडावेळ ठेवा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Megha Singh (@hack_it_with_megha)

एकाचवेळी 5 चपात्या 
एकाचवेळी 5 चपात्या लाटण्यासाठी सर्वात अगोदर 5 कणकेचे गोळे घ्या. त्यावर खूप सुखे पीठ लावावे. ज्यामुळे चपात्या लाटताना एकमेकांवर चिकटणार नाही. यानंतर त्या 5 चपात्यांना अतिशय हलक्या हाताने एकमेकांपासून वेगळ्या करा. यामुळे एकाचवेळी तुम्ही 5 चपात्या तयार करु शकता. अनेकदा चपात्या तयार करायला कंटाळा येतो. त्या लाटणे मग भाजणे यासारख्या कष्टाच्या कामावर हा उपाय अतिशय उपयोगी असल्याच म्हटलं जातं आहे. 

कोणी किती चपाती खावी?

गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या एका चपातीमध्ये सुमारे 104 कॅलरीज आढळतात. एका चपातीमध्ये 20 ग्रॅम कर्बोदके आणि 70 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आढळतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुरुष आणि स्त्रियांसाठी रोटीचे प्रमाण वेगळे असते. महिलांनी सकाळी 2 चपात्या आणि संध्याकाळी 2 चपात्या खाव्यात. त्याच वेळी, पुरुषांनी सकाळी 3 चपात्या आणि संध्याकाळी 3 चपात्या खाव्यात.

गॅसमध्ये चपाती शिजवू नका

वेळ वाचवण्यासाठी बहुतेक लोक गॅसवर रोटी भाजतात. पण असे करणे हानिकारक ठरू शकते. गॅसवर ब्रेड बेक केल्याने आत भरलेली हवा आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे ब्रेड बनवण्याच्या इतर पद्धतीचा अवलंब केल्यास बरे होईल.

(Disclaimer - हा व्हायरल व्हिडीओ आहे. या व्हिडीओची कोणतीही खातरजमा झी चोवीस तास करत नाही)