IPL 2023: BCCI चा IPL 2023 बाबत मोठा निर्णय, जर खेळाडूला कोरोना...!

IPL 2023:  आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिला सामना गुजरात आणि चेन्नई या दोन संघांमध्ये रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीचं BCCI चा IPL 2023 बाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

Updated: Mar 19, 2023, 02:10 PM IST
IPL 2023:  BCCI चा IPL 2023 बाबत मोठा निर्णय, जर खेळाडूला कोरोना...!  title=
IPL 2023 BCCI

IPL 2023:  यंदा इंडियन प्रीमियर लीगचा 2023 (Indian Premier League) 16वा सीझन 31 मार्चपासून सुरु होणार आहे. ज्यामध्ये 10 संघ सहभागी होणार आहेत. जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या आयपीएलच्या 16 (IPL 2023) व्या हंगामाचा पहिला सामना गुजरात आणि चेन्नईमध्ये रंगणार आहे. तर IPL 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. मात्र यापूर्वीचं बीसीसीआयने (BCCI) आयपीएल संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

आयपीएल (IPL 2023) सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने मोठा बदल जाहीर केला आहे. फ्रँचायझींसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत, जी सर्व संघांच्या खेळाडूंना पाळावी लागतील. आयपीएल (IPL 2023) सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने स्पर्धेच्या सुरक्षेच्या कारणास्तव मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बीसीसीआयने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

वाचा : IND vs AUS सामना होणार का? पाहा विशाखापट्टणमचं हवामान 

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, या आठवड्यात आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींना कोविड मार्गदर्शक तत्त्वे सांगितली जातील. हे मार्गदर्शक तत्त्वे पूर्वीसारखे कठोर नसले तरी, जर एखादा खेळाडू किंवा संघातील सदस्याला कोरोनाची लागण झाली तर त्याला खेळाडूला किमान 1 आठवड्याचा आयसोलेशन कालावधी घ्यावा लागेल. तसेच तो खेळाडू कोणत्याही संघाच्या कोणत्याही सामन्यात किंवा सराव सत्रात भाग घेऊ शकणार नाही. 

नवीन वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे 

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला आठवडाभर आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. यानंतर, पाचव्या दिवशी त्या खेळाडूची आरटीपीसीआर चाचणी होईल. ही चाचणी निगेटिव्ह आल्यास 24 तासांच्या आत पुन्हा चाचणी केली जाईल. दोन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच खेळाडू संघातील सदस्यांमध्ये सामील होऊ शकेल.

घरच्या मैदानावर सामने खेळवले जातील

गेल्या तीन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयने कठोर नियम केले होते. परंतु यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने संघांना त्यांच्या घरच्या क्रिकेट मैदानावरही खेळता येणार आहे. मात्र, बीसीसीआयने वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्येही बरीच शिथिलता दिली आहे. कोरोनाबाबत बीसीसीआयचे असे मत आहे की, अजूनही याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.