आता पोस्ट ऑफिसमध्येच करू शकता पासपोर्टसाठी नोंदणी; जाणून घ्या सोपी प्रोसेस

 पासपोर्ट बनवण्याचा विचार करीत तर आता पासपोर्ट सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही

Updated: Jul 26, 2021, 10:08 AM IST
आता पोस्ट ऑफिसमध्येच करू शकता पासपोर्टसाठी नोंदणी; जाणून घ्या सोपी प्रोसेस  title=

नवी दिल्ली : पासपोर्ट बनवण्याचा विचार करीत तर आता पासपोर्ट सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा पासपोर्टसाठी अप्लाय करू शकता. India Post आता भारतातील अनेक पोस्ट ऑफिसेसमध्ये पासपोर्ट नोंदणीची सुविधा देत आहे. यासाठी तुम्हाला फक्त पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्विस सेंटर काउंटरला भेट देणं गरजेचं असेल. जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

पोस्ट ऑफिसमध्ये बनेल पासपोर्ट
भारतीय पोस्टने या सुविधेची माहिती एक ट्विटद्वारे दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आता पोस्ट ऑफिसच्या CSC काउंटरवर पासपोर्ट रजिस्टर करणे सोपं झालं आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करा

ऑनलाईन अप्लाय करा आणि पोस्ट ऑफिसमध्ये जा
काही पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. तारीख मिळाल्यानंतर रिसिटची हार्ड कॉपी मुळ कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावे लागतील. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल.  पडताळणी झाल्यानंतर पासपोर्टसंबधीत माहिती SMS द्वारे दिली जाईल.या प्रक्रीयेला साधारण 15 दिवसांचा अवधी लागतो.