घरबसल्या करता येणार आधार कार्डातील या 4 दुरुस्त्या

अनेकदा आधार कार्डवर असलेल्या चुकीच्या माहितीमुळे अनेकांची महत्वाची कामं अटकून राहतात. 

Updated: Jun 22, 2021, 06:26 PM IST
घरबसल्या करता येणार आधार कार्डातील या  4 दुरुस्त्या title=

मुंबई : आधार कार्डाला  (Aadhaar Number) गेल्या काही वर्षांमध्ये महत्व प्राप्त झालं आहे. जन्म दाखल्यापासून ते लस घेण्यापर्यंत आधार कार्ड महत्वाचं आणि बंधनकारक आहे. पण अनेकदा आधार कार्डवर असलेल्या चुकीच्या माहितीमुळे अनेकांची महत्वाची कामं अटकून राहतात. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व काही बंद होतं. त्यामुळे अनेकांना आपल्या आधारवरील चुकांमध्ये दुरुस्त्या करता आल्या नाहीत. या दुरुस्ती करण्यासाठी तासोंतास सर्व्हिस सेंटरवर (Aadhaar service centre) रांगेत ताटकळत उभं रहावं लागतं. (You can now 4 Aadhaar updates via online know to full proces) 

दरम्यान आधारमधील या 4 दुरुस्त्यांसाठी तुम्हाला सर्व्हिस सेंटरवर जाण्याची आवश्यकता नाही. या  4 अपडेट्स तुम्ही घरबसल्या ऑनलाईनही करु शकता.  सेल्फ सर्व्हिस अपडेटच्या मदतीने (SSUP) नाव, जन्म तारिख, एड्रेस आणि लिंग या चार बाबी अपडेट करु शकता.  UIDAI ने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

   
नोंदणीकृत मोबाईल नंबर आवश्यक  

या 4 बाबींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक अट आहे. यासाठी आधारसह रजिस्टर्ड मोबाईल नंबर  लिंक असणं बंधनकारक आहे. या लिंक असलेल्या मोबाईल नंबरद्वारे तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल. 4 बाबी ओटीपीशिवाय दुरुस्त करता येणार नाहीत. त्यामुळे आधारसह मोबाईल लिंक बंधनकारक आहे. आधारसोबत मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तसेच तो बदलून घेण्यासाठी सर्व्हिस सेंटरवर जावे लागेल.

कागदपत्र बंधनकारक

आधार कार्डवरील नावातील बदलासाठी तसेच जन्मतारीखेत दुरुस्तीसाठी प्रत्येक डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी जमा करावी लागेल. पण जेंडर अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज लागणार नाही.  

आधार कार्डातील दुरुस्ती केल्यानंतर त्याबाबतची अपडेट जाणून घेण्यासाठी  URN आणि आधारच्या साहाय्याने  खालील लिंकवर क्लिक करुन जाणून घेऊ शकता.  

https://ssup.uidai.gov.in/checkSSUPSstatus/checkupdatestatus

शुल्क किती?

आधार कार्डातील प्रत्येक दुरुस्तीसाठी तुम्हाला 50 रुपये मोजावे लागतील. आधार कार्डधारकाला फक्त 2 वेळा नावात बदल करता येऊ शकतो. तर लिंग जन्मतारीख केवळ एकदाच बदलता येते.  

संबंधित बातम्या : 

Aadhaar Card : आता जन्मत: बाळाचे कार्ड काढता येणार !