फैजाबादचं नाव अयोध्या, योगींची घोषणा

योगी आदित्यनाथांची आणखी एक घोषणा

Updated: Nov 6, 2018, 10:05 PM IST
फैजाबादचं नाव अयोध्या, योगींची घोषणा title=

भोपाळ : देशात राम मंदिर निर्माणाबाबत वाद सुरु असताना अयोध्या दिव्यांनी उजळून निघाला आहे. त्यातच आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्यामध्ये ऐतिहासिक दीपोत्सव साजरा केला. या भव्य आयोजनाच्या साक्षी होत्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला किम जंग सूक.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील आयोध्याला पोहोचले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, आम्ही नवा उत्साह आणि नवा संकल्प घेऊन अयोध्येवा पोहोचलो आहेत. आम्ही आमच्या इतिहासाशी जुडण्यासाठी येथे आलो आहोत.

सीएम योगी यांनी आज फैजाबादचं नाव अयोध्या करण्याची घोषणा देखील केली. अयोध्या आमची आण-बाण आणि शान आहे. अयोध्येची ओळख श्रीराम यांच्याशी आहे. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी अयोध्या आणि जनकपूर याचा संबंध बनवला. पंतप्रधान मोदींनी 4 वर्षाच्या कार्यकाळात रामराज्य साकारण्याचं प्रयत्न केला. त्यांनी गरीबांसाठी अनेक योजना आणल्या.