भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या आधी सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार दाखल होत आहेत. या दरम्यान देखील उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत आहे. यातच एका उमेदवार चक्क 500 गाड्या घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या. हे पाहून सगळेच हैराण झाले. समाजवादी पक्षाच्या उमेदवार मीरा दीप नारायण यादव यांनी हे शक्तीप्रदर्शन केलं.
टीकमगड विधानसभेच्या जागेसाठी त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मीरा दीप नारायण यादव यांच्यासोबत यावेळी 500 गाड्यांचा ताफा होता. हे पाहून पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी देखील हैराण झाले. पण असं करणं त्यांना महागात पडलं. परवानगी शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या घेऊन आल्याने पोलिसांनी त्यांच्या 300 गाड्या जप्त केल्या आणि कलम 188 नुसार कारवाई केली.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की, 'परवानगी नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून 3 किलोमीटर दूर एका ठिकाणी गाड्या थांबवण्यात आल्या. नियमानुसार फक्त 3 गाड्याच कार्यालयाजवळ गेल्या.'