शहीदांच्या परिवाराला मिळणार एवढा निधी

 शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला मिळणारा २५ लाखाचा सहायता निधी ५० लाख करण्यात आली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 21, 2017, 04:17 PM IST
शहीदांच्या परिवाराला मिळणार एवढा निधी title=

लखनौ: शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला मिळणारा २५ लाखाचा सहायता निधी ५० लाख करण्यात आल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. पोलीस स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

" राज्य सरकार शहीदांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे आणि त्यांच्या हितासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील आणि आवश्यक ती सर्व मदतही केली जाईल.शहीदांच्या परिवाराला मिळणारा २० लाखाचा सहायता निधी वाढवून ४० लाख करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या आईवडिलांना मिळणाऱ्या ५ लाखाच्या निधित वाढ करुन १० लाख करण्यात आली आहे. त्यामूळे शहीदांच्या कुटुंबियांना ५० लाखापर्यंतचा सहाय्यता निधी देण्यात येणार आहे.
पौष्टिक आहारातील भत्त्यात वाढ झाल्याची घोषणा करत, योगी म्हणाले की अत्यंत गंभीर परिस्थितीतही कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात आणि सांप्रदायिक सलोखा कायम ठेवण्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

राज्य सरकारने माफ व भ्रष्टाचारमुक्त राज्य करण्यासाठी गंभीरपणे सुरू केले. मुख्यमंत्री म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था सुधारली जाईल. या दिशेने खूप काम बाकी आहे. गुन्हेगारीमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य बनविण्यासाठी राज्य सरकार गतीने पाऊले उचलत असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

ईद-उल-फितर, बकरी-ईदच्या, मोहरम, दुर्गा पूजा, दसरा यासारख्या महत्त्वाच्या सणांसाठी पर्यायी सुरक्षा व्यवस्था आखल्याचे सांगत आपल्याला कायदे व्यवस्था अधिक प्रभावी बनवावी लागले असेही त्यांनी सांगितले. स्त्रियांच्या संरक्षणासाठी आणि सशक्तीकरणासाठी 'अँटी रोमियो स्क्वॉड' स्थापन करुन एक महिना अभियान चालविल्याचे योगी यांनी सांगितले.  राज्य सरकारने पोलिस अधिकार्यांना किमान ६० मिनिटांचे 'फुट पेट्रोलिंग' करण्याचे निर्देश दिल्याचे ते म्हणाले.