मुंबई : स्वत:च्याच सरकारविरोधात अकोल्यात आंदोलन करणाऱ्या भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या सात पैकी सहा मागण्या सरकारनं मान्य केल्यात.
मात्र माफेडने शेतमाल किमान आधारभूत किमतीत खरेदी करण्याबाबत ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा यशवंत सिन्हा तसेच आंदोलकांनी घेतलाय. शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्यात दोन ते तीन तास ठिय्या आंदोलन केलं.
दरम्यान पोलिसांनी यशवंत सिन्हा यांना अटक केली असून यशवंत सिन्हांना भेटण्यासाठी शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांच्यासह अनेक नेत्यांनी धाव घेतली..