मुंबई : उत्तर भारत हा महिलांच्या दृष्टीने असुरक्षित तर सर्वात जास्त महिला गोव्यात सुरक्षित असून, महाराष्ट्राचा नंबर यात नववा आहे. प्लान इंडियाद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
गोवा राज्यात महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित असलं, तरी बिहार राज्य सर्वात असुरक्षित आहे. बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश राज्य आणि दिल्ली संघराज्य देखील महिलांसाठी असुरक्षित असल्याचं आकडेवारी सांगते.
गोव्यानंतर सुरक्षित राज्य आहे, केरळ, यानंतर मिझोरम, सिक्कीम, मणीपूर. प्लान इंडियाने तयार केलेला हा अहवाल महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला.
या अहवाल महिला सुरक्षेची स्थिती महाराष्ट्रात जेमतेम आहे. महाराष्ट्र नवव्या स्थानावर असला, तरी इतर राज्यांपेक्षा किंचित चांगली आहे. या बाबतीत महाराष्ट्राचा शेजारी असलेला गुजरात १६ व्या स्थानी आहे.
गोवा शिक्षण तसेच आरोग्याच्या बाबतीत पाचव्या, तर गरिबीच्या बाबतीत आठव्या स्थानी आहे. महिला सुरक्षेसह काही बाबतीत गोव्याची कामगिरी चांगली झाली आहे.
केरळ आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत नंबर एक आहे. आरोग्य सुविधांच्या बाबतही बिहारची कामगिरी खराब असल्याचे आकडेवारीवरून दिसून येतं.