भारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळतात 'या' 9 सुविधा, प्रत्येकाला माहिती हवीच!

DETAILS OF FACILITIES PROVIDED TO FEMALE PASSENGERS: रेल्वेतून प्रवास करताना महिलांसाठी भारतीय रेल्वेकडून काही खास सुविधा दिल्या जातात. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 23, 2024, 02:57 PM IST
भारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळतात 'या' 9 सुविधा, प्रत्येकाला माहिती हवीच! title=
women passenger 9 special treatment and benefits from Indian railway know the details

DETAILS OF FACILITIES PROVIDED TO FEMALE PASSENGERS: महिला रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे अनेक सोयी-सुविधा दिल्या आहेत. मात्र, रेल्वेच्या सोयी-सुविधा अद्यापही अनेक महिलांपर्यंत पोहोचल्या नाहीत. कधी एकट्याने प्रवास करत असताना महिलांना या सुविधांबाबत व अधिकारांबाबत माहिती असणं गरजेचे आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास सुखाचा व सोप्पा होण्यासाठी भारत सरकारने महिलांसाठी अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा प्रदान केल्या आहेत. ज्याबाबत अनेकांना माहिती नसते. जर तुम्ही कधी एकट्याने किंवा मुलांसोबत किंवा ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करत असाल तर सुरक्षेसंबंधी सरकारचे काही नियम आहे. ते आज जाणून घेऊयात. 

1. एखाद्या कारणास्तव एखादी महिला रात्री एकटीने प्रवास करत असेल आणि तिच्याकडे तिकिट नसेल किंवा हरवले असेल तर टीटीई तिला ट्रेनमधून उतरवू शकत नाही. जर एखाद्या महिलेला रात्रीच्या वेळी ट्रेनमधून उतरण्याची जबरदस्ती केली जात असेल तरती महिला रेल्वे अथॉरिटीला तक्रार करु शकते. खरं तर विना तिकिट प्रवास करणे कायदेशीररित्या गुन्हा आहे मात्र, तरीदेखील महिलेला ट्रेनमधून उतरवले असल्यास तिला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम आरपीएफ किंवा जीआरपीचे असेल. 

2. स्लीपर क्लासमध्ये प्रत्येक कोचमध्ये सहा ते सात लोअर बर्थ, वातानुकूलित 3 टियर (3AC) मध्ये प्रति डबा चार ते पाच लोअर बर्थ आणि वातानुकूलित 2 टियर (2AC) मध्ये प्रति डबा तीन ते चार लोअर बर्थ महिलांसाठी आरक्षित असतात.  गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक,45 वर्षे आणि त्याहून अधिक महिला प्रवाशांसाठी निश्चित करण्यात आला आहे.

3. रेल्वेची ही प्रणाली स्वयंचलित असल्याने, ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला प्रवाशांना लोअर बर्थ देण्याची सरकारी तरतूद आहे. सीटच्या उपलब्धतेवर हे अवलंबून असते.

4. ऑनलाइन बुकिंग व्यतिरिक्त ज्या स्थानकात तिकिट बुकिंगसाठी महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र काउंट नाहीत तिथे महिला प्रवाशांना सामान्य रांगेत उभे राहण्याची गरज नसते. 

5. महिला प्रवाशांनाही मेल\ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये अनारक्षित श्रेणीतही प्रवास करता येतो. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वेमध्ये सेपरेट कंपार्टमेंट व कोच उपलब्ध असतात. उपनगरीय गाड्या व लोकल या 150 किमीपर्यंतचेच अंतर कापतात. 

6. जिथे आवश्यकता असेल आणि शक्य झाल्यास भारतीय रेल्वेकडून महिला विशेष ट्रेनदेखील चालवल्या जातात. याबाबत तुम्ही रेल्वे ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करु शकता.

7. अनेक महत्त्वाच्या स्थानकात महिला प्रवाशांसाठी वेटिंग रुम किंवा हॉल तयार करण्यात आले आहेत. नियमांनुसार, महिलांसाठी वेगळे स्वच्छतागृहदेखील असले पाहिजेत. 

8. रेल्वेने महिला प्रवाशांसाठी हेल्पलाइनदेखील सुरू केली आहे. हेल्पलाइन नंबर 182 च्या माध्यमातून रात्री किंवा दिवसा कधीही फोन करुन सुरक्षेसाठी मदत मागू शकता. हा नंबर थेट डिव्हिजनल सिक्युरिटी कंट्रोल रुमला जोडतो. जे आरपीएफल अंतर्गंत येते. तुम्ही केलेला फोन थेट आरपीएफ कर्मचाऱ्यासोबत कनेक्ट होणार आहे. जर कोणी तुमचा छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुम्हाला जेवण, स्वच्छता, डब्याची देखभाल, वैद्यकीय मदत यासंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता.

9. रेल्वे सुरक्षा दलामार्फेत मेरी सहेली ही मोहिम राबवण्यात येते. याअंतर्गंत पोलिस महिला प्रवाशांकडे जाऊन त्यांची चौकशी करतात. जर एखादी समस्या असेल तर लगेचच त्यावर तोडगा काढण्यात येतो. सध्या ही सुविधा लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहे.