कामास नकार दिल्याने महिलेचं कापलं नाक

वेठबिगारी करण्यास नकार दिल्याने एका महिलेचं नाक कापण्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 18, 2017, 03:53 PM IST
कामास नकार दिल्याने महिलेचं कापलं नाक title=

भोपाळ : वेठबिगारी करण्यास नकार दिल्याने एका महिलेचं नाक कापण्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेनंतर मध्य प्रदेशातील महिला आयोगाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा लता वानखेडे यांनी म्हटलं की, हा एक गंभीर प्रकार आहे. महिलेला जबरदस्तीने वेठबिगारीचे काम करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होतं. मात्र, त्या महिलेने नकार दिल्याने तिचं नाक कापण्यात आलं. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

लता वानखेडे यांनी पीडित महिलेची भेट घेऊन तिची विचारपूस केली आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पीडित महिला ही दलित आहे. 

पीडित महिलेने काम करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने या महिलेला आणि तिच्या कुटूंबियांना मारहाण करुन तिचं नाकं कापलं. या घटनेनंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.