खूशखबर ! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्‍याच्या मुख्‍यमंत्र्य़ांना पत्र लिहून पेट्रोलियम प्रोडक्‍ट्स जसे नॅचरल गैस, क्रूड ऑयल सारख्या वस्तूंवर सेल्स टॅक्स कमी करण्यास सांगितलं आहे. यांना जीएसटीमध्ये नाही घेतलं जाणार. पण याचा उपयोग वस्‍तुंसाठी इनपुटच्या करत असतील तर मग त्यावर जीएसटी लागणार आहे.

Updated: Aug 18, 2017, 03:46 PM IST
खूशखबर ! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार title=

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्‍याच्या मुख्‍यमंत्र्य़ांना पत्र लिहून पेट्रोलियम प्रोडक्‍ट्स जसे नॅचरल गैस, क्रूड ऑयल सारख्या वस्तूंवर सेल्स टॅक्स कमी करण्यास सांगितलं आहे. यांना जीएसटीमध्ये नाही घेतलं जाणार. पण याचा उपयोग वस्‍तुंसाठी इनपुटच्या करत असतील तर मग त्यावर जीएसटी लागणार आहे.

अर्थमंत्र्यांनी उत्पादन क्षेत्रातील चिंतांचा उल्‍लेख पत्रात केला आहे. जीएसटीमध्ये पेट्रोलियम प्रोडक्‍ट्सच्या इनपुट कॉस्‍टमध्ये वाढ झाल्याची तक्रार उत्पादकांनी केली आहे.

जेटलींनी मुख्‍यमंत्र्यांना पत्र लिहून पेट्रोलियम प्रोडक्‍ट्सवर वॅटचा भार कमी करण्याचा आग्रह केला आहे. एकाच वस्तूवप २ वेळा टॅक्स लागत असल्याचं लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या राज्यात डिझेल, पेट्रोल, गॅस यावर वेगवेगळे वॅट लागतात.