मुंबई : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आनंद म्हणून ईद-ए-मिलाव-अल-नबी साजरा केला जातो. १ ते २ डिसेंबर असे दोन दिवस मुस्लिम बांधव हा उत्सव साजरा करत असतात.
पैगंबर हजरत मोहम्मद शेवटचे संदेशवाहक आणि सर्वात महान संदेष्टे मानले जातात. ज्यांना खुद्द अल्लाहने देवदूत जिब्रईलद्वारा कुराणचा संदेश दिला.
त्यामुळे मुस्लिम बांधवांना त्यांच्याबद्दल नेहमी आदराची भावना असतो.
मुस्लिम समाजाचा एक मोठा उत्सव समजला जाणाऱ्या सणाविषयी या समाजात वेगवेगळी मते आहेत. शिया आणि सुन्नी यांची या दिवसाबद्दल स्वत:ची अशी मते आहेत. पण साजरा करणारे मोठ्या धूम धडाक्यात या दिवसाला साजरा करतात.
या दिवसात रात्रभर प्रार्थना सुरू असते. पैगंबर मोहम्मद यांच्या प्रतीकात्मक पावलांच्या निशाणावर प्रार्थना केली जाते. या दिवशी मोठमोठ्या मिरवणूकही काढल्या जातात.
या दिवशी महम्मद हजरत यांची आठवण काढली जाते, त्यांचे विचार वाचले जातात.
इस्लामचा सर्वात पवित्र ग्रंथ कुराण देखील या दिवशी वाचला जातो. याव्यतिरिक्त, लोक मक्का मदिना आणि दरगाहमध्ये जातात.
असे म्हटले जाते की, हा दिवस नियमात पाळणारे अल्लाहच्या जवळ जातात आणि त्यांच्यावर अल्लाहची कृपा राहते.