शाहजहांचे काळा ताजमहल बांधण्याचे स्वप्न का राहिले अधुरे? कुणासाठी बांधणार होता?

Taj Mahal : पांढऱ्या ताजमहल प्रमाणेच काळा ताजमहल बांधण्याचे शाहजहांचे स्वप्न होते. मात्र, त्याचे हे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही. 

वनिता कांबळे | Updated: Mar 15, 2024, 09:21 PM IST
शाहजहांचे काळा ताजमहल बांधण्याचे स्वप्न का राहिले अधुरे?  कुणासाठी बांधणार होता? title=

Black Taj Mahal : ताजमहल म्हंटला की डोळ्यांसमोर येते ती एक भव्यदिव्य, देखणी वास्तू. पृथ्वीतलावर ताजमहल इतकी सुंदर वास्तू नाही. यामुळेच ताजमहल हे जगातील सात आश्चर्यांपैकी (Seven wonders)एक आहे. मुघल बादशाह शाहजहानने आपली पत्नी मुमताजसाठी ताजहमल बांधला. ताजमहल प्रेमाचे प्रतिम म्हणूने ओळखला जातो. पांढऱ्या ताजमहल प्रमाणेच काळा ताजमहल बांधण्याचे शाहजहांचे स्वप्न होते. मात्र, त्याचे हे स्वप्न अधूरेच राहिले. शाहजहांला का आणि कुणासाठी बांधायचा होता हा काळा ताजमहल जाणून घेवूया.

जगातील सात आश्चर्यांपैकी एक अशी ताजमहलची ओळख. प्रेमाचं प्रतिक असलेला ताजमहल भव्यता आणि सुंदरतेमुळे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मुघल बादशहा शाहाजहाननं पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ही भव्य दिव्य वास्तू उभारली. ताजमहल उभारायला तब्बल 21 वर्षं लागली. जवळपास 20 हजार कामगार ताजमहलच्या निर्मितीसाठी दिवसरात्र झटत होते. त्याच्या अनेक वादग्रस्त आख्यायिका आहेत. मुघल स्थापत्य शैलीचे अप्रतिम उदाहरण म्हणूनही ताज महलकडे पाहिले जाते. ताज महल हे मानवी कला आणि कार्याचे उत्कृष्ट नमुना म्हणून देखील ओळखले जातो. ताज महलच्या मुख्य इमारतीच्या मध्य भागी मुघल बादशहा शहाजहान ची पत्नी मुमताज बेगम ची समाधी आहे.

इतिहासात पांढऱ्या ताजमहालसोबत काळ्या ताजमहालचाही उल्लेख

पांढऱ्या शुभ्र संगमरवी दगडाचा ताजमहल आपण पाहतोच. या पांढऱ्या ताजमहल प्रमाणेच  काळा ताजमहल आपल्याला पहायला मिळाला असता. ‘काळा ताजमहल’ बांधण्याचे शाहजहांचे स्वप्न होते. इतिहासात पांढऱ्या ताजमहालसोबत काळ्या ताजमहालचाही उल्लेख आहे.  आग्रा येथील ताजमहलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शाहजहा असाच आणकी एक दुसरा ताजमहाल बांधणार होता. हा ताजमहल पूर्णपणे काळा असणार होता. काळ्या दगडांनी ताजमहाल बांधण्याची शहाजहानची इच्छा होती. मात्र, त्याची ही कधीच पूर्ण झाली नाही. शाहजहान काळ्या संगमरवराने हा दुसरा ताजमहाल बांधणार होता. सध्या अस्तित्वात असलेल्या ताजमहल प्रमाणेच हा ताजमहल देखील खूपच भव्य असा असणार होता. काळ्या दगडातीस या ताजमहलची रचना ताजमहाल सारखी असणार होती.

शाहजहांला कुणासाठी बांधायचा होता काळा ताजमहल?

जेथे मुमताजसाठी ताजमहल बांधला आहे त्या ताजमहालच्या मागेच यमुना नदीच्या पलीकडे असलेल्या महताब बाग परिसरात शहाजाला हा काळा ताजमहाल बांधायचा होता असा दावा केला जातो. शहाजहानची पत्नी मुमताजची समाधी ताजमहालमध्ये बांधण्यात आली आहे. शहाजहानला स्वतःची समाधी या काळ्या ताजमहालमध्ये बांधायची होती.  मात्र, शाहजहानचे स्वत:साठी काळ ताजमहल बांधण्याचे स्वप्न अधूरे राहिले. काळा ताजमहल बांधण्याची योजना आखत असतानाच शहाजाहनचा औरंगजेबाशी संघर्ष सुरू झाला. औरंगजेबाने शाहजहानला नजरकैदेत ठेवले यामुळे त्याचे काळा ताजमहल बांधण्याचे स्वप्न अधुरे राहिले. युरोपियन लेखक जीन-बॅप्टाइझ टॅव्हर्नियर यांनी याबाबत दावा केला आहे. टॅव्हर्नियर यांनी आपल्या काल्पनिक लेखनात प्रथम ब्लॅक ताजच्या कल्पनेचा उल्लेख केला.  तर,  काळा ताजमहल उभारणीचा दाव्यात काहीच तथ्य नसल्याचा दावा काही संधोधकांनी केला आहे.