विमानाने प्रवास करताना अनेकांना विंडो सीटकडे बसण्याची हौस असते. विमानातून दिसणारं दृश्य हे अचंबित करणार असतं. पण तुम्ही कधी पाहिलं आहे का? विमानातील खिडक्या या गोलाकार का असतात? याचं उत्तर विमानाच्या सुरक्षिततेशी निगडीत आहे का?
रीडर्स डायजेस्टच्या अहवालानुसार विमानाच्या खिडक्या नेहमी गोल नसतात. 1950 पूर्वी विमानातील खिडक्या चौकोनी आकाराच्या होत्या. त्या काळी विमाने हळू चालत असत आणि आजच्या तुलनेत थोडी कमी उडत असत.
स्कॉट चीप फ्लाइटचे प्रोडक्ट ऑपरेशन स्पेशलिस्ट विलिस ऑर्लँडो म्हणतात की, असे करण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिले कारण विमानाच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. जेव्हा विमान आकाशात उडते तेव्हा हवेचा दाब तयार होतो. गोल खिडकीमुळे हवेचा दाब तिच्या प्रत्येक भागावर सारखाच पडतो. जेव्हा असे होते, तेव्हा खिडक्या क्रॅक होण्याचा धोका कमी असतो.
विलिस सांगतात की, आकाशात प्रवास करताना विमानाच्या आत आणि बाहेर हवेचा मोठा दबाव असतो. खिडकी गोल असल्यामुळे सतत हवेचा दाब बदलल्यामुळे डॅमेज होण्याची रिस्क कमी असते. उलट विमानाची गती वाढल्यामुळे तो दबाव वाढलेला राहतो.
1950 पूर्वी, विमाने मंद गतीने प्रवास करत असत, त्यामुळे ते अधिक इंधन वापरत होते आणि ते अधिक महाग होते. विमानाने प्रवास करण्याचा ट्रेंड वाढल्याने विमान कंपन्यांनी इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी वेग वाढवला. वेग वाढल्याने वाढलेला दाब कमी करण्यासाठी गोल खिडक्या बसवल्या जाऊ लागल्या. यामागे आणखी एक कारण आहे. चौकोनी खिडक्यांपेक्षा गोल खिडक्या अधिक सुंदर दिसतात. हा त्यांचा प्लस पॉइंट आहे.