पद्म पुरस्कार कोणाला आणि कसे दिले जातात? तुम्ही देखील यासाठी अप्लाय करु शकता... फक्त ही पात्रता असावी

जे लोक त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांना सरकारकडून पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.

Updated: Aug 13, 2021, 08:21 PM IST
पद्म पुरस्कार कोणाला आणि कसे दिले जातात? तुम्ही देखील यासाठी अप्लाय करु शकता... फक्त ही पात्रता असावी title=

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात रुग्णांच्या सेवेत गुंतलेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्ली सरकार विशेष आदर देईल आणि त्यांची नावे पद्म पुरस्कारांसाठी पाठवली जातील. वास्तविक, दरवर्षी भारत सरकारच्या वतीने, जे लोक त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांना सरकारकडून पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. यासाठी, सरकार सर्व राज्यांमधून नामांकन आमंत्रित करते आणि त्यानंतर पद्म पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाते.

पण, तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही यासाठी तुम्ही स्वतः देखील अर्ज करू शकता. तुम्ही ऑनलाईन परीक्षा फॉर्म प्रमाणे अर्ज करू शकता. त्यानंतर अर्ज केल्यानंतर सरकारकडून नावं निवडले जातील. 

परंतु त्यापूर्वी यासाठी कोण अर्ज करू शकते? आणि पद्म पुरस्कारांसाठी काय पात्रता आहे हे जाणून घ्या.

अर्ज कसा करावा?

यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट https://padmaawards.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि तुमची माहिती देण्याबरोबरच तुम्ही केलेल्या प्रशंसनीय कार्याची माहिती तुम्हाला वेबसाइटवर अपलोड करावी लागेल.

नामांकन आणि शिफारशींमध्ये पोर्टलवर उपलब्ध स्वरूपात नमूद केलेले सर्व संबंधित तपशील, वर्णनात्मक स्वरूपात एक कोट (जास्तीत जास्त 800 शब्द) यांचा समावेश असावा, ज्यात व्यक्तीच्या विशिष्ट आणि असाधारण कामगिरी आणि प्रदान केलेल्या सेवांचा समावेश असावा.

कधी पर्यंत अर्ज करू शकतो?

प्रजासत्ताक दिनी, 2022 रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांची नामांकनं सुरू झाली आहेत. यासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 15 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात आणि नामांकन प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. यानंतर, त्यांची नावे 25 जानेवारी 2021 रोजी घोषित केली जातील. 

हे पुरस्कार 3 श्रेणीत दिले जाते यातील पद्मविभूषण हे असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी, पद्मभूषण हे उच्च दर्जाची विशिष्ट सेवा आणि पद्मश्री हे प्रतिष्ठित सेवेसाठी देले जातात.

शिफारस देखील करू शकता

पद्म पुरस्कारासाठी अर्ज केल्यानंतर, कोणीती दुसरी व्यक्ती तुमची शिफारस देखील करु शकते. यामध्ये दोन प्रकारच्या श्रेणी आहेत, ज्यामध्ये एक श्रेणी सामान्य माणसाची आहे, ज्याद्वारे सामान्य माणूस शिफारस करतो. त्याच वेळी, एका वर्गात, देशातील मान्यवर जसे की खासदार, आमदार किंवा कोणतेही उच्च अधिकारी समाविष्ट आहेत आणि ते त्यासाठी अर्जही करतात.