मुंबई : टोकियो ऑलिम्पिकची 8 ऑगस्टला सांगता झाली आहे. त्यानंतर सर्व खेळाडू आपआपल्या मायदेशी परत आले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Tokyo 2020) भारताला 7 पदकं मिळाली आहेत. त्यात एक Gold, दोन सिल्वर आणि 4 कांस्य मेडल्स आहेत. भारताला टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये नरज चोप्राने 13 वर्षांनी गोल्ड मेडल मिळवून दिलं.
या मेडल्सच्या संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यात सर्वाधीक लोकांना हा प्रश्न पडतो की, हे Gold मेडल संपूर्णपणे सोन्याचे बनलेले असते का? किंवा हे खरेच सोन्याचे असते का? या मेडलचे वजन किती आहे? त्यात किती सोनं आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत.
ऑलिम्पिक मेडल्स जरी 500 ग्रॅमची असली तरी सर्वाधिक वजन असलेले मेडल्स टोकियो ऑलिम्पिकमध्ये आहेत. यावेळी Gold मेडल सुमारे 556 ग्रॅम आहे, तर Silver मेडल्स 550 ग्रॅमची आहे आणि ते पूर्णपणे चांदीचे बनलेले आहे. त्याच वेळी, Bronze मेडल्स 450 ग्रॅमचे आहे, जे 95 टक्के तांबे आणि 5 टक्के जस्त यांचे मिश्रण करून बनवले जाते. हे मेडल्स अनेक गोष्टींचा पुनर्वापर करून बनवले जातात आणि त्यात सुमारे 92 टक्के शुद्ध चांदी असते, कारण ती काच, एक्स-रे प्लेट्स इत्यादींपासून बनवली जाते.
ऑलिम्पिकमधील कोणत्याही खेळातील सर्वोत्तम कामगिरीसाठीच Gold मेडल दिले जाते. जर आपण त्यातील सोन्याबद्दल बोललो, तर हे पदक पूर्णपणे सुवर्ण किंवा सोन्याचे नसते. या Gold मेडलमध्ये फक्त सोन्याची थाळी असते, आणि तो पूर्णपणे चांदीचा बनलेला असतो. असे म्हटले जाते की, त्याच्या वजनाच्या 1% पेक्षा थोडे जास्त त्यात सोनं असतं, त्यामुळे यामध्ये जवळजवळ 6 ग्रॅम सोनं आहे असे आपण म्हणू शकतो. Olympics.com च्या मते, त्यात 6 ग्रॅमपेक्षा थोडे जास्त सोने आहे.
यजमान शहराची आयोजक समिती मेडलच्या रचनेसाठी जबाबदारी घेते आणि हे खेळानुसार बदलू शकते. ही मेडल्स विशेषतः डिझाइन केलेले असतात आणि खेळाडूंना पदकासह रिबन देखील देण्यात येते. यावेळचे मेडल्स विशेष जपानी पद्धतीने डिझाइन केले गेले आहे.
ऑलिम्पिक इतिहासकारांच्या आंतरराष्ट्रीय सोसायटीचे अध्यक्ष डेव्हिड व्हॅलेकिन्स्की यांनी 'द कम्पलीट बुक ऑफ द ओलंपिक्स' या पुस्तकातून संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी सीएनएनला सांगितले की, हे फोटोग्राफर्समुळे होते. ते म्हणाले होते, 'मला वाटते की क्रीडा पत्रकार हे एक आयकॉनिक फोटो म्हणून पाहतात, ज्याला ते सेल करु शकतात. त्यामुळे फक्त एक पोजसाठी असं केलं जातं त्याव्यतिरीक्त महत्त्वाचं कोणतंही कारण नाही.