मुंबई : ब्रिटीश महिला अधिकारी आणि भारतीय तरुणाचे लग्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. विदेशी मुलींसोबत अनेक भारतीय मुलं लग्न करतात. एवढेच काय तर अनेक भारतीय महिला विदेशी मुलांसोबत लग्न करतात. परंतु हे लग्न बऱ्याचदा त्या देशाचं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी किंवा विदेशात कायमचं सेटल होण्यासाठी असतं. मात्र हे लग्न थोडं वेगळं आहे. येथे भारतीय तरुणाने चक्कं विदेशी महिला अधिकारीशी लग्न केलं आहे आणि हे दोघेही भारतातच राहाणार आहेत.
यामुळे लोकांना असा प्रश्न पडला आहे की, हा असा कोणता तरुण आहे, ज्याने चक्क विदेशी अधिकारीसोबत लग्न केलं आहे.
ब्रिटनची डेप्युटी ट्रेड कमिशनर रियानॉन हॅरीस, दिल्लीत काम करते आणि तिने भारताच्या हिमांशू पांडेशी विवाह केला आहे.
रायनने ट्विट करून आपल्या लग्नाची माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हिमांशू पांडे, ज्यांला ब्रिटनची ही महिला अधिकारी आपलं हृदय देऊन बसली आहे.
Rhiannon Harries च्या ट्विटर प्रोफाइलनुसार, ती भारतात उप व्यापार आयुक्त (दक्षिण आशिया) म्हणून काम करते. तर हिमांशू पांडे हा चित्रपट निर्माता आहे.
हिमांशूने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये स्वतःला GODROCK Films कंपनीचा संस्थापक आणि संचालक म्हणून सांगितले आहे. त्याने एका यूट्यूब चॅनलची लिंकही शेअर केली आहे.
इंस्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू पांडे एक स्वतंत्र चित्रपट निर्माता आणि श्री अरबिंदो सेंटर फॉर आर्ट्स अँड कम्युनिकेशनचा माजी विद्यार्थी आहे. एका दशकाहून अधिक काळ अनुभव असलेल्या हिमांशूने विविध चित्रपट आणि व्हिडीओ प्रोजेक्टमध्ये कास्टिंग डायरेक्टर, डायरेक्टर, लेखक आणि निर्माता म्हणून काम केले आहे.
ADJB प्रोडक्शन न्यू यॉर्कसारख्या संस्थांसाठी चित्रपट शूटिंग आयोजित करण्यात आणि नियोजन करण्यातही त्याचा सहभाग आहे.
नुकतेच हिमांशू आणि रायन हॅरीस लग्नबंधनात अडकले. रायन हॅरीसने आपल्या ट्वीटर हँडलवरुन याची माहिती दिली.
भारत आता तिचे कायमचे घर आहे, याचा तिला खूप आनंद होत असल्याचे हॅरीचे म्हणणे आहे. तिने लग्नाचा फोटो शेअर करताना #IncredibleIndia तसेच #shaadi #livingbridge #pariwar हॅशटॅग देखील वापरले आहेत.
दुसरीकडे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील ब्रिटनचे उपउच्चायुक्त अँड्र्यू फ्लेमिंग यांनी हॅरीला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अँड्र्यूने ट्विटरवर लिहिले- माझी मैत्रीण रियानॉन हॅरीसचे अभिनंदन. संपूर्ण ब्रिटिश उच्चायुक्तालय हैदराबादच्या वतीने त्यांना आणि त्यांच्या नवऱ्याला शुभेच्छा. काही जबाबदाऱ्यांमुळे विवाह सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही, याबद्दल अँड्र्यूने निराशा व्यक्त केली. ट्विटरवरील अनेक वापरकर्त्यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले.