Toilet Seat: इंडियन की वेस्टर्न स्टाईल टॉयलेट! जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Indian Vs Western Toilet: भारत सरकारकडून प्रत्येक घरात शौचालय असायला हवं यासाठी मोहीम सुरु आहे. घराघरात टॉयलेट असावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मोहीम जोरात सुरू आहे. दुसरीकडे, घरात वेस्टर्न टॉयलेट (Western Toilet) वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. 

Updated: Jan 2, 2023, 02:54 PM IST
Toilet Seat: इंडियन की वेस्टर्न स्टाईल टॉयलेट! जाणून घ्या फायदे आणि नुकसान title=

Indian Vs Western Toilet: भारत सरकारकडून प्रत्येक घरात शौचालय असायला हवं यासाठी मोहीम सुरु आहे. घराघरात टॉयलेट असावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मोहीम जोरात सुरू आहे. दुसरीकडे, घरात वेस्टर्न टॉयलेट (Western Toilet) वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. वेस्टर्न सीट बसण्यासाठी आरामदायी असल्याने पसंती दिली जाते. पण असं असलं तरी इंडियन सीट ही वेस्टर्न टॉयलेटपेक्षा चांगली आहे. तुम्ही वाचलं ते अगदी बरोबर आहे. वेस्टर्न टॉयलेट आरामदायी असल्याने आजारी पाडू शकते. दुसरीकडे इंडियन टॉयलेटमध्ये पूर्ण शरीराची हालचाल होते. त्याचबरोबर वेस्टर्न टॉयलेटमधून संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. कारण वेस्टर्न सीटचा वापर करताना स्किनचा संपर्क येतो. 

इंडियन की वेस्टर्न सीट- एका रिसर्चनुसार इंडियन टॉयलेटचा वापर करणाऱ्यांची शारीरिक हालचाल जास्त होते. तळव्यापासून डोक्यापर्यंत शरीरावर दाब जाणवतो. मात्र वेस्टर्न सीट त्या तुलनेत आरामदायी असते. शारीरिक हालचाल होत नसल्याने आजारपणाला निमंत्रण मिळू शकतं.

फ्रेश होण्यास लागणारा वेळ- इंडियन टॉयलेटमध्ये फ्रेश होण्यासाठी कमी वेळ लागतो. पोट 3 ते 4 मिनिटात रिकामी होतं. तर वेस्टर्न सीटवर पोट साफ होण्यास 5 ते 7 मिनिटांचा अवधी लागतो. कधी कधी तर पोट व्यवस्थित साफ देखील होत नाही. इंडियन टॉयलेटमध्ये बसताना पोट आणि पचनसंस्थेवर दाब येतो. त्यामुळे पोट साफ होण्यास अडचण येत नाही.

बातमी वाचा- वडिलांच्या कष्टाच चीज! तिनं करून दाखवलं...ही Success Story वाचून तुम्हाला मिळेल प्रेरणा

संसर्ग- वेस्टर्न टॉयलेटमध्ये संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. वेस्टर्न सीट त्वचेच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते. 

गरोदरपणामध्ये कोणतं टॉयलेट बेस्ट- गर्भधारणेत महिलांना इंडियन टॉयलेट जास्त चांगलं ठरतं.कारण त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते. याशिवाय भारतीय आसन वापरल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)