पंतप्रधान मोदी बाळगतात अश्वासनांच्या थापांचे पुस्तक - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी त्यांनी विविध धार्मिक स्थळे, विद्यालये यांचे दौरे सुरू केले आहेत. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 24, 2018, 11:19 PM IST
पंतप्रधान मोदी बाळगतात अश्वासनांच्या थापांचे पुस्तक - राहुल गांधी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत थापाडे आहेत. ते सभांसाठी, भाषणांसाठी जेथेही कुठे जातात तेथे ते थापाच मारत असतात. त्यांच्याकडे थापांचे पुस्तकच आहे, असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी लोकांना भलतीच अश्वासने देतात. जी त्यांना पूर्ण करता येत  नाहीत. ते नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रूपये जमा करणार असल्याचे सांगतात. कधी रोजगार देण्याविषयी बोलतात. तडाखेबंद भाष ठोकताना ते शेतकऱ्यांना मदत करण्याचीही भाषा बोलतात. पण, त्यातले एकही अश्वासन पूर्ण होत नाही. भाषण ठोताना पुढे लोक कोण आहेत हे पाहून ते आश्वासने देत असतात. थापा मारण्यात आणि खोटे बोलण्यात मोदींना कोणीच आव्हान देऊ शकत नाही, असेही राहूल गांधी म्हणाले.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुक काँग्रेसच जिंकणार 

कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी मलावली भागात सभा घेतली. या सभेत त्यांनी मोदींवह जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप अनेक दावे करते आहे. पण, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुक काँग्रेसच जिंकणार असा दावाही राहुल गांधी यांनी केला. कर्नाटकात येत्या काळात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रमुख्याने मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातच आहे. देशभरातील राजकीय स्थिती, निवडणुकांचा निकाल पाहता दोन्ही पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

 राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये संपूर्ण लक्ष केंद्रीत केले

दरम्यान, राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी त्यांनी विविध धार्मिक स्थळे, विद्यालये यांचे दौरे सुरू केले आहेत. आज (शनिवार, २४ मार्च) सकाळी त्यांनी म्हैसूर येथील महाराणी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.