Know your Rights | मापात पाप करणाऱ्यांची तक्रार कुठे करायची?

दुकानदारांची तक्रार कुठे आणि कशी करायची, याबाबतची माहिती देणार आहोत.

Updated: Jun 24, 2021, 04:41 PM IST
Know your Rights | मापात पाप करणाऱ्यांची तक्रार कुठे करायची? title=

मुंबई : अनेक दुकानदार ग्राहकांची फसवणूक करतात. ग्राहकाला बोलण्यात गुंतवून किंवा हातचलाखी करुन दुकानदार अनेकदा मापात पाप करतात. ग्राहक दुकानदारावर विश्वास ठेवतात. याचाच गैरफायदा हे दुकानदार घेतात. एखाद दिवशी मापात पाप करत असल्याची बाब ग्राहकाच्या लक्षात येतं. दुकानदाराचा भांडाफोड होतो. दुकानदाराप्रती असलेल्या विश्वासाला तडा जातो. ग्राहकाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. अशा वेळेस दुकानदाराची तक्रार कुठे करायची, याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. या अशा दुकानदारांची तक्रार कुठे आणि कशी करायची, याबाबतची माहिती देणार आहोत. (Where to report shopkeepers cheating customers, know the the rules and details)   

ग्राहाकांची फसवणूक होते. पण नेमकी तक्रार कुठे आणि कशी करायची, याबाबतची माहिती नसल्याने ग्राहकांची पडती बाजू होते. ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीच्या तक्राकरारीचं  निवारण करण्यासाठी प्रत्येक राज्यात एक विभाग असतो. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात ग्राहकाला  फसवणूक करणाऱ्या दुकानदाराची तक्रार करता येते.   

ग्राहकांना नियमांनुसार योग्य प्रमाणात वस्तू मिळाव्यात, यासाठी प्रत्येक राज्यात वैध मापन शास्त्र यंत्रणा असते. ग्राहकाला योग्य आणि प्रमाणात वस्तू मिळावी, याची संपूर्ण जबाबदारी ही या यंत्रणेवर असते. यासाठी या विभागाचे अधिकारी अनेक दुकांनांच्या वजन मापांची तपासणी करतात. जर संबंधित दुकानदार नियमांनुसार ग्राहकांना वस्तू देत नसेल, मापात पाप करत असेल तर त्या विरोधात कारवाई करण्याचे हक्क  अधिकाऱ्याला असतात.  

अनेकदा डब्ब्यासह मिठाईचं वजन मोजलं जातं. जे की नियमांनुसार चूकीचं आहे. समजून घ्या, अशी विनवणी दुकानदार ग्राहकाला करतो. पण हे नियमांनुसार चूक आहे. एखादा दुकानदार ग्राहकांसोबत असं वागत असेल, तर त्याची तक्रार करायला हवी. 

...तर दुकानदारावर कारवाई 

मापात पाप करताना दुकानदार आरोपी सापडल्यास त्याच्यावर कारवाई करता येते. दुकानदाराला आर्थिक दंडासह कारावासही भोगावा लागू शकतो. दुकानदार ग्राहकाकडून छापील किंमतीपेक्षा अधिक दर आकारु शकत नाही. छापील किंमतीपेक्षा अधिक दर घेणं दंडनीय अपराध आहे. अनेक दुकानदार हे एखाद्या वस्तूवर प्राईज टॅग लावतात. दुकानदार मनमानी दराने वस्तू विकतात. हे ही चूक आहे. एखाद्या वस्तूचे पॅकिंग करणाऱ्या व्यापाऱ्याने त्याच्या दुकानाची राज्याच्या वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे नोंदणी करायला हवी.  

तक्रार  कुठे करायची? 

ग्राहक फसवणूकीची तक्रार स्टॅंर्डड्स ऑफ वेट्स अॅन्ड मेजर्स (Standards of Weights And Measures Act in Detail) एनफोर्मेंट अॅक्ट 1985 नुसार करता येते. ग्राहकाला फोन, मेल तसेच इतर माध्यमाच्या मदतीने तक्रार नोंदवता येते. साधारणपणे तक्रार दाखल केल्यानंतर 15 दिवसांमध्ये तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती दिली जाते. या लिंकवर जाऊन तक्रार दाखल करता येऊ शकते.      

तक्रारीसाठी लिंक

https://grahak.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=2...

अधिक नियम जाणून घेण्यासाठी क्लिक करा... 

संबंधित बातम्या : 

डेल्टा प्लसमुळे चिंता वाढली! राज्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता

आईसोबत बांगड्या विकणारा मुलगा, पण जिद्दीला पेटला आणि थेट कलेक्टर झाला