लॉकडाऊनमधील मदतीनंतर अभिनेता सोनू सूद, आता विकतोय सायकलीवर अंडी आणि पाव

सोनूला त्याच्या मार्केटमधील सर्व वस्तूंचे दरही लक्षात आहेत. ज्याची झलक त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये लोकांना दिली आहे

Updated: Jun 24, 2021, 04:21 PM IST
लॉकडाऊनमधील मदतीनंतर अभिनेता सोनू सूद, आता विकतोय सायकलीवर अंडी आणि पाव title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोनाकाळात लोकांसाठी देवदूत बनून आला. आजकाल तर लोकं त्याला 'रिअल लाइफ हिरो', 'गॉड ऑफ द अर्थ' म्हणू देखील बोलू लागले आहेत. कोरोना कालावधीत सोनू सूदने लोकांना मदतीचा हात दिला. अभिनेत्याने कोणत्याही स्वार्थाशिवाय लोकांना मदत केली आणि आज संपूर्ण जग यासाठी त्याचे अभिवादन करत आहे.

आता या अभिनेत्याने स्वत: चे सुपरमार्केटही उघडले आहे. सोनूला त्याच्या मार्केटमधील सर्व वस्तूंचे दरही लक्षात आहेत. ज्याची झलक त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये लोकांना दिली आहे. या अगोदर सोनूने ढाबा उघडला होता. त्याने या पूर्वी दारुचे दुकानही उघडले होते. आता त्याने चक्कं अंडी आणि ब्रेड विकण्याचे कामही सुरू केले आहे.

सोनू सूदने स्वत: चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्याने सांगितले आहे की, त्याने आता आपली नवीन सुपरमार्केट उघडली आहे. 'सोनू सूदचा सुपरमार्केट' असे या सुपरमार्केटचे नाव आहे. या व्हिडिओमध्ये सोनू म्हणत आहे की, "कोण म्हणतो मॉल बंद आहेत. आमच्याकडे सर्वात महत्वाचे आणि महागडे सुपरमार्केट तयार आहे. हे सर्व काही पाहा, माझ्याकडे सध्या अंडी देखील आहे ज्याची किंमत सध्या सहा रुपये आहे. त्यानंतर ब्रेड आहे, मोठं पॅकेट 40 रुपयांचं तर छोटं पॅकेट 22 रुपयांचं आहे."

अभिनेता पुढे म्हणतो, "ज्याला पाहिजे असेल, त्याने पटकन ऑर्डर द्या, माझी डीलिव्हरीची वेळ संपली आहे. आणि हो, होम डीलिव्हरीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल." अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सामायिक करत अभिनेत्याने 'फ्री होम डिलीव्हरी 10 अंड्यांवर एक ब्रेड फ्री' लिहिले आहे.

यापूर्वी व्हिडिओ सामायिक करून अभिनेत्याने सांगितले होते की, आपण त्याचे लिंबू पाण्याचे दुकान देखील उघडणार आहोत. ज्याचे नाव असेल 'सोनू सूदचा लिंबू पाणी'. सोनू सूदच्या चाहत्यांना त्यांची ही शैली खूप आवडते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलीकडेच 'फादर डे'च्या निमित्ताने आपल्या मुलाला तीन कोटी रुपयांची लक्झरी कार गिफ्ट केल्याची बातमी चर्चेत आली होती. ज्याला सोनू उत्तर देते आहे आणि तो म्हणाला की, 'फादर डेच्या दिवशी मी माझ्या मुलाला गाडी का गिफ्ट करू? त्याने मला का भेट देऊ नये? अखेर, हा दिवस माझा आहे, नाही का? मजेची गोष्ट वेगळी आहे, जेव्हा मी माझ्या दोन मुलांसोबत संपूर्ण दिवस घालवेन तिच माझ्यासाठी फादर डेसाठी सर्वात चांगली भेट असेल. कारण मुलांसाठी माझ्याकडे फारच कमी वेळ असतो."