जेव्हा नवाज शरीफ म्हणाले, 'वाजपेयी पाकिस्तानमध्येही निवडणूक जिंकू शकतात'

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. 

Updated: Aug 16, 2018, 09:05 PM IST
जेव्हा नवाज शरीफ म्हणाले, 'वाजपेयी पाकिस्तानमध्येही निवडणूक जिंकू शकतात' title=

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वाजपेयी हे 93 वर्षांचे होते. ११ जूनपासून अटल बिहारी वाजपेयी एम्स रुग्णालयात होते. पण मागच्या ४८ तासांपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. प्रकृती खालावल्यामुळे बुधवारपासून त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले होते. अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशिया नावाच्या आजाराने ग्रासले होते. २००९ पासून ते व्हिलचेअरवर होते. ११ जूनला किडनीच्या संसर्गामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली.

पंतप्रधान असताना अटलजींनी अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले. अटलजींनी भारत आणि पाकिस्तानमधले सुधारण्याचाही प्रयत्न केला. याचाच भाग म्हणून अटलजींनी दिल्ली-लाहोर बस सेवा सुरु केली. १९ फेब्रुवारी १९९९ साली वाजपेयींनी बससेवेचं उद्घाटन केलं.

अटारी-वाघा बॉर्डरवरून अटलजी बसनं लाहोरला पोहोचले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लाहोरमध्ये त्यांचं स्वागत केलं. वाजपेयी हे पाकिस्तानमध्येही निवडणूक जिंकू शकतात, असं या यात्रेदरम्यान नवाज शरीफ म्हणाले होते.