Halloween म्हणजे काय आणि तो दरवर्षी का आयोजित केला जातो? जाणून घ्या...

दक्षिण कोरियामध्ये या हॅलोविन पार्टीमुळे 150 लोकांचा बळी गेलाय

Updated: Oct 31, 2022, 10:36 AM IST
Halloween म्हणजे काय आणि तो दरवर्षी का आयोजित केला जातो? जाणून घ्या... title=

दक्षिण कोरियाची (South Korea) राजधानी सियोलमधील (Seoul) येथे झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) 150 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर शेकडो लोक जखमी झाले आणि 50 हून अधिक लोकांना हृदयविकाराचा झटका (cardiac arrest) आला. हे सर्व लोक सियोलमधील इटवॉन भागात आयोजित हॅलोविन फेस्टिव्हलमध्ये (Halloween Party) सहभागी होण्यासाठी जमले होते. सोशल मीडियावर (Social Media) असे डझनभर व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यात लोक इकडे तिकडे पळताना आणि चिरडले जात असताना दिसत आहेत. या अपघातानंतर अनेकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे की, अखेर हॅलोविन (Halloween) आहे तरी का? (What is Halloween)

हॅलोविन (Halloween) 31 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जातो. याचा शाब्दिक अर्थ पाहिला तर आत्म्यांचा दिवस असा होतो. यामुळे हॅलोविनसाठी पोशाख (Halloween Costume) म्हणून लोक भूतांसारखे (Ghost) कपडे घालतात आणि त्यांचा गेटअप तसाच करतात. ही शेकडो वर्षे जुनी परंपरा आहे जी भारताव्यतिरिक्त बहुतेक पाश्चात्य देशांमध्ये साजरी केली जाते. भारतातही ते हळूहळू सुरू होत आहे.

हॅलोविन म्हणजे काय?

हा पाश्चात्य देशांचा सण आहे. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी हा त्याचा उद्देश आहे. मात्र, आता त्याचे रुपांतर इव्हेंटमध्ये झाले आहे. या दिवशी कपड्यांमुळे त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते.  याबद्दलही अनेक कथा आहेत.

हॅलोविन फक्त 31 ऑक्टोबरलाच का?

ऑल सेंट्स डे  1 नोव्हेंबर रोजी असतो म्हणजे सेल्टिक कॅलेंडरचा पहिला दिवस. याच्या एक दिवस आधी सेल्टिक कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस असतो. म्हणूनच ते ऑल सेंट्स इव्ह, ऑल हॅलोज इव्ह, ऑल हॅलोज इव्ह आणि ऑल हॅलोविन या नावांनी ओळखले जाते. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपासून जसे सेलिब्रेशन सुरू होतो, त्याचप्रमाणे हॅलोविनही 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून सुरू होतो.

हॅलोविन कसा साजरा केला जातो?

या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे हॅलोविनचा पोशाख. लोक भीती वाटतील असे कपडे घालतात आणि एकमेकांच्या घरी जातात आणि भेटवस्तू देतात. अनेक शहरांमध्ये मोठे कार्यक्रमही आयोजित केले जातात. पोकळ भोपळ्यासारख्या पिशव्या घेऊन मुले या दिवशी घरोघरी जातात. हे भोपळे शेवटी गोळा करून पुरले जातात. वेशभूषेनुसार, लोक राक्षस, भूत, सांगाडा, पिशाच, डायन आणि ममीचे रूप धारण करतात.

दरम्यान, सुरुवातीला हा सण विशिष्ट धर्माचा होता, पण आता हळूहळू तो सर्व धर्माचे लोक साजरा करतात. भारतासारख्या हिंदू-मुस्लिम बहुसंख्य देशातही हा ट्रेंड सुरू झाला आहे.