Viral Video: मुलीच्या लग्नात वडिलांचा धम्माल डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही पण पडला प्रेमात

 सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका लग्नात वधूचे वडील आपल्या मुलीच्या लग्नात बिनधास्त नृत्य करताना दिसत आहेत. 

Updated: Oct 30, 2022, 06:35 PM IST
Viral Video: मुलीच्या लग्नात वडिलांचा धम्माल डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही पण पडला प्रेमात title=

Viral Video: लग्नसभारंभ म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतं ते डान्स (Dance Video) आणि संगीत. त्यामुळे कायमच लग्नसभारंभांमध्ये डान्सची आतेषबाजी पाहायला मिळते. त्यातून डान्सचे चित्रविचित्र प्रकार पाहायला मिळतात आणि एकाच हशा उडतो. लग्नसमारंभात अनेक प्रकारचे नृत्य तुम्ही पाहिले असेल. या बारात्यांपैकी (Wedding Viral Video) काहींचे विचित्र डान्सही पाहिले असतील. कधीकधी ह्यांचे नृत्य (Wedding Dance Video) पाहून आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील हसू आवरता येणार नाही. इतकं की हसून हसून आपंल पोटंही दुखू लागेल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video on Social Media) तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका लग्नात वधूचे वडील आपल्या मुलीच्या लग्नात बिनधास्त नृत्य करताना दिसत आहेत. (viral video bride father dances on the song oo antava in a marriage ceremony)

त्यांनी चक्क एका आयटम सॉन्गवर (Item Song) डान्स करायला सुरूवात केली आहे. नवरीच्या वडिलांचा डान्स पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये डान्स करणारे वधूचे वडील पुष्पा (Pushpa Songs) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'ऊ अंतवा' (Oo Anatava) या हिट गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

नाचून नाचून वधूच्या वडिलांनी अक्षरक्षः स्टेज पेटवला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा मजेदार व्हिडिओ तुम्ही देखील पहा आणि हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या गुप्र मधल्या डान्सर मित्राची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या डान्समध्ये काही डान्सर्सनीही वधूच्या वडिलांना डान्समध्ये साथ दिली. पण उत्तम नर्तकांसमोरही काकांचे नृत्य आणि भाव लोकांचे लक्ष वेधून घेत होते. हा व्हिडिओ (Video) पाहून अनेकांना वधूच्या वडिलांचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडत (Comments on social media) होता. वधूच्या वडिलांचा डान्स पाहून सर्व पाहुणे हुल्लडबाजी करू लागले.

हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एकाच दिवसात हजारो वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी व्हिडिओलाही लाइक केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.